spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Carrom Game : ‘गुजरातमधील ३६व्या राष्ट्रीय खेळांमध्ये ‘कॅरम’ खेळाचा समावेश का नाही?’

गुजरातमध्ये गुरुवारपासून ३६व्या राष्ट्रीय खेळांना सुरुवात होणार झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन होणार झाले. गुजरात प्रथमच या खेळांचे आयोजन करण्यात आले. १.२५ लाख लोकांच्या उपस्थितीत रंगारंग उद्घाटन कार्यक्रम करण्यात आला. येथे अनेक नामवंत खेळाडू पंतप्रधानांना एकतेची मशाल दाखवतील. यावेळी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, मोहित चौहान यांच्यासह देशभरातील ५० कलाकार परफॉर्म करण्यात आले. १० ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या खेळांमध्ये देशभरातील सुमारे ८,००० खेळाडू तसेच प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांसह १५,००० लोक सहभागी होणार आहेत. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा राष्ट्रीय खेळ मानला जातो. अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, वडोदरा, राजकोट आणि भावनगर या राज्यातील सहा शहरांमध्ये खेळल्या जाणार्‍या या खेळांमध्ये ३६ स्पर्धा होणार आहेत. यावेळी प्रथमच बोडोलँड प्रादेशिक क्षेत्र, लडाख, दादरा नगर हवेली आणि दमण-दीव सहभागी होणार आहेत.

हेही वाचा : 

RBI Hike Repo Rate : तुमच्या कर्जाचा EMI वाढणार

गुजरातमध्ये होणारा राष्ट्रीय खेळ हा ३६वा राष्ट्रीय खेळांना सुरुवात झाली आहे. याबाबत डॉ आनंद अरविंद प्रधान प्रिन्सिपल रेडिओलॉजिस्ट यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी म्हटले,गुजरातमध्ये होणारा राष्ट्रीय खेळ हा ३६वा राष्ट्रीय खेळ आहे. त्यात कॅरमचा समावेश झाला आहे की नाही, याबाबत शंका आहे, या स्पर्धेत कॅरम खेळाचा समावेश झाली नाही, तर त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कारण कॅरम हा एकमेव खेळ आहे जो आम्हा सर्वांना एकत्र ठेवतो, जर कॅरमचा या राष्ट्रीय खेळात समावेश झाला तर मला खूप आनंद होईल. माझ्या मनात कॅरमबद्दल उच्च स्तरावरील आदराची भावना आहेत. असे मत डॉ आनंद अरविंद प्रधान यांनी व्यक्त केले.

PM Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर, आज वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार

राष्ट्रीय स्पर्धा २०१५ नंतर प्रथमच होत आहेत. विविध कारणांनी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात येत होती. गोव्यात होणारी ही स्पर्धा आता गुजरातमध्ये होत आहे. अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, राजकोट, बडोदा, भावनगर ही शहरे राष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज झाली आहेत. अहमदाबाद, गांधीनगरमध्ये बहुतांशी स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे या परिसरातील चौका-चौकात मोठमोठी होर्डिंग लागली आहेत. शहर चकाचक झाले आहे, मोठमोठ्या चौकांमध्ये रोषणाई करण्यात आली आहे, मैदाने सज्ज झाली आहेत, पोलिस बंदोबस्तही वाढला आहे.

Nilesh Rane : विनायक राऊतांच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर म्हणाले, औकातीत राहावं अन्यथा ठाकरेंची इज्जत,अब्रू…

Latest Posts

Don't Miss