spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Paris Olympics 2024 : कुस्तीपटू Vinesh Phogat यांच्या अपात्र याचिकेवर CAS ने लांबवला निर्णय; जाणूयात नक्की काय घडलं न्यायालयात

भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला ५ ० किलो वजनी गटात कुस्तीच्या अंतिम सामन्यापूर्वी १०० ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र घोषित करण्यात आले. विनेश सुवर्णपदक जिंकणार हे निश्चित मानले जात होते, मात्र अंतिम फेरीच्या दिवशी तिला अपात्र घोषित करण्यात आले. यानंतर विनेशने तिला रौप्य पदक देण्यासाठी सीएएसकडे (CAS: Court of Arbitration of Sport) आवाहन केले होते. विनेश फोगटचा खटला भारतातील सर्वात मोठे वकील हरीश साळवे लढत आहेत. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कुस्तीपटू विनेश फोगटच्या ऑलम्पिक अपात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर क्रीडा लवाद न्यायालय (CAS) शनिवारी (१० ऑगस्ट) रात्री भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता निकाल देणार होते. आता, यासंबंधी क्रीडा लवादाच्या न्यायालयाने (CAS) एक प्रेसनोट जारी केली आहे. त्यामध्ये विनेश फोगटच्या खटल्याची निकालासाठी नवीन तारीख जाहीर केली आहे. ऑलम्पिक समितीच्या निर्णयावर भारतीय ऑलम्पिक संघटनेनं ‘सीएएस’कडं दाद मागितली होती. या प्रकरणाचा निकाल आज (११ ऑगस्ट) येणं अपेक्षित होतं. मात्र, निकाल पुढं ढकलण्यात आला आहे. हा निकाल आता १३ ऑगस्टच्या रात्री साडेनऊ वाजेपर्यंत लागू शकतो, अशी माहिती भारतीय ऑलम्पिक संघटनेनं दिली.

नेमका काय झाला युक्तिवाद ?

वृत्तानुसार, सुनावणीत विनेश फोगटकडून अनेक मुद्दे उपस्थित केले गेले.

  • ज्यामध्ये विनेश फोगटने कोणतीही फसवणूक केलेली नाही, हे स्पष्ट आहे, त्यामुळे तिला रौप्य पदक देण्यात यावे, असा युक्तिवाद सुनावणीदरम्यान करण्यात आला.
  • दुसरी बाजू अशी मांडण्यात आली आहे की, विनेश फोगटचे वजन वाढणे ही शरीराची नैसर्गिक पुनर्प्राप्ती प्रक्रिया होती, ज्यामध्ये ती काहीही करू शकत नव्हती.
  • खेळाडूला त्याच्या शरीराची काळजी घेण्याचा अधिकार असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
  • चौथ्या आणि शेवटच्या युक्तिवादात असे म्हटले आहे की, पहिल्या दिवशी विनेशचे वजन निर्धारित मानकापेक्षा कमी होते आणि स्पर्धेदरम्यान पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे हा कुस्तीपटूचा मूलभूत अधिकार आहे.

कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहणार, CM Ekath Shinde यांची ग्वाही

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss