चेतन शर्मा पुन्हा निवड समितीचे अध्यक्ष, ‘या’ माजी क्रिकेटपटूंच्या नावांवर BCCIचा शिक्कामोर्तब

त्यानंतर बीसीसीआयने नवीन निवड समिती स्थापन करण्याची घोषणा केली. आता पुन्हा बोर्डाने चेतन शर्मा यांना मुख्य निवडकर्ता म्ह्णून निवडले आहे.

चेतन शर्मा पुन्हा निवड समितीचे अध्यक्ष, ‘या’ माजी क्रिकेटपटूंच्या नावांवर BCCIचा शिक्कामोर्तब

५० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय क्रिकेट संघाची नवीन निवड समिती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी, ७ जानेवारी रोजी ५ सदस्यीय पुरुष वरिष्ठ निवड समितीची नावे जाहीर केली, ज्यामध्ये ४ सदस्य पूर्णपणे नवीन आहेत परंतु सर्वात महत्त्वाचे नाव मुख्य निवडकर्त्याचे आहे, ज्यामध्ये चेतन शर्मा यांचा समावेश आहे. जे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळात परतले आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील मागील निवड समितीच्या कार्यकाळात भारताला टी२० विश्वचषक स्पर्धेत दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर बीसीसीआयने नवीन निवड समिती स्थापन करण्याची घोषणा केली. आता पुन्हा बोर्डाने चेतन शर्मा यांना मुख्य निवडकर्ता म्ह्णून निवडले आहे.

बीसीसीआयने शनिवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नवीन निवड समितीच्या घोषणेची माहिती दिली. नवीन निवड समितीमध्ये फक्त चेतन शर्मा हा जुना चेहरा आहे, तर इतर चार नावे प्रथमच वरिष्ठ निवड समितीचा भाग असतील.

बीसीसीआय निवड समिती २०२३:

ऑस्ट्रेलियात झालेल्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर बीसीसीआयने मागील निवड समितीचा कार्यकाळ पूर्ण न करताच नवीन नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. १८ नोव्हेंबर रोजी त्या घोषणेच्या ५० दिवसांनंतर, बीसीसीआयने अखेर नवीन समिती नियुक्त केली. अशोक मल्होत्रा, सुलक्षणा नाईक आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने ६०० हून अधिक अर्जांपैकी ११ अर्जाची निवड केली होती, ज्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि शेवटी समितीने या ५ नावांची शिफारस केली, अशी माहिती बीसीसीआयने दिली. जुन्या समितीतून शर्मा यांच्याशिवाय हरविंदर सिंग यांनी पुन्हा अर्ज केला होता, पण त्यात हरविंदर यांना संधी मिळाली नाही.

मागील निवड समितीचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बीसीसीआयने नवीन निवड समिती नेमण्याची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत यावेळी पूर्णपणे नवे चेहरे पाहायला मिळतील, असे मानले जात होते. तथापि, बोर्डाने यामध्ये बराच वेळ घेतला आणि या काळात केवळ जुनी समिती टीम इंडियाची निवड करत होती. तथापि, त्यानंतर १ जानेवारी रोजी, जेव्हा बीसीसीआयने टीम इंडियाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आणि २०२३ च्या विश्वचषकासाठी रोडमॅप तयार करण्यासाठी बैठक घेतली, तेव्हा चेतन शर्माच्या उपस्थितीमुळे ते बीसीसीआयमध्ये पुन्हा परतणार असल्याचे स्पष्टपणे सूचित केले.

हे ही वाचा:

Tunisha Sharma प्रकरणातील शिझान खानच्या जामिनावरील सुनावणी होणार ९ जानेवारीला

युक्रेनच्या लष्करी गुप्तचर प्रमुखांचा धक्कादायक दावा, ‘या’ आजारामुळे होऊ शकतो व्लादिमीर पुतिन यांचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version