spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कॉमनवेल्थ २०२२ : भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली तब्बल ६ पदकं

यंदाच्या वर्षी सर्व भारतीय खेळाडू हे फॉर्ममध्ये खेळत आहेत. दर दिवशी पदकं ही जिंकली जात आहेत.

मुंबई :- यंदाच्या वर्षी सर्व भारतीय खेळाडू हे फॉर्ममध्ये खेळत आहेत. दर दिवशी पदकं ही जिंकली जात आहेत. इंग्लंडच्या बर्मिगहम येथे सुरु कॉमनवेल्थ २०२२ स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टर्सच्या उत्तम कामगिरीनंतर आता कुस्तीपटूंनीही अप्रतिम कामगिरी बजावली आहे. आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत सहा पदके खिशात खटले आहेत. आज भारताच्या सहा कुस्तीपटूंनी पदकावर नाव कोरले आहे. ज्यामुळे आज भारताची पदसंख्या हि २६ झाली आहे. यामध्ये तीन सुवर्णपदकासह एक रौप्य आणि दोन कसे पदकांची समावेश आहे.

यंदा भारताचे पुरुष आणि महिला कुस्तीपटू फॉर्ममह्ये त्यांची कामगिरी बजावर आहेत. महिला या तें मधून साक्षी मलिक हिने थेट सुवर्णपदकाला गवसणी घातले आहे तर पुरुषांमध्ये बजरंग पुनिया यांनी देखील थेट सुवर्णपदक पटकावले आहे. कॅनडाच्या मॅकनील मात देत कुस्तीपटू बजरंग पुनिया याने ६५ किलो वजनी गटात विशेष कामगिरी बजावली आहे. त्यापाठोपाठ महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने फ्री स्टाईल ६२ कॅलिग्राम गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. साक्षीने भारताला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. तर भारताच्या दीपक पुनिया याने ८६ किलोग्रॅमच्या वजनात पाकिस्तानच्या मुहम्मद इनामला नमवत सुवर्णपदक मिळवलं आहे.

महिला विभागातील ५७ किलो लढतीत अंशू मलिकला नायजेरियाच्या ओडुनायो अ‍ॅडेकुओरोयेचे आव्हान पेलवले नाही. अंशूला सुवर्णपदकाच्या लढतीत ओडुनायोकडून ३-७ असा पराभव पत्करावा लागला. तसेच लॉन बाऊल्समध्ये पुरुषांच्या गटाने इंग्लंडला १२-१३ ने मात देत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताचे किमान रौप्यपदक हे निश्चित झाले आहे.

तर भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने युगांडाच्या हुसिना कोबुगाबेचा २१-१०, २१-९, तर श्रीकांतने श्रीलंकेच्या डुमिंडू अ‍ॅबीविक्रमाचा २१-९, २१-१२ असा पराभव केला. तसेच टेबल टेनिसमध्ये मनिका बात्रा आणि श्रीजा अकुला यांनी ऑस्ट्रेलियाच्या जी मिनह्युंगवर ११-४, ११-८, ११-६, १२-१० असा दमदार विजय मिळवत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

हे ही वोचा :- 

शिवसेना – भाजप युती सरकारला जनतेचा कौल , मुख्यमंत्र्यांचे ट्विट वायरल

 

Latest Posts

Don't Miss