spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ : भारताच्या सुधीरने सुवर्णपदकांवर कोरले नाव

भारताच्या सुधीरने बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा हेव्हीवेट पॉवरलिफ्टिंग या प्रकारात सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले आहे.

मुंबई – भारताच्या सुधीरने बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा हेव्हीवेट पॉवरलिफ्टिंग या प्रकारात सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले आहे. त्याच्या या सुवर्ण कामगिरीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. २७ वर्षीय सुधीर याने पहिल्याच प्रयत्नांत २०७ किलो वजन यशस्वीरीत्या उचलेले व त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नांत २१२ किलो वजन उचलून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. १३४. ५ गुणांसह सुधीरने सुवर्णपदक पटकावले आहे आणि विक्रम रचला आहे.

सुधीर हा पोलिओग्रस्त असून या आजाराचा सामना करत अथक प्रयत्नांनी त्याने हा विजय जिद्दीने मिळविला आहे. यापूर्वी सुधीरने जागतिक पॅरा पॉवरलिफ्टिंग आशियाई खुल्या अजिंक्यपद स्पर्धेत २१४ किलो वजन उचलून भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली होती. २०१३ मध्ये कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुधीरने अनेक स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

या वर्षी क्रीडाप्रकारात १३३.६ गुणांसह इकेचुक्वू ख्रिच्शियन ओबिचक्वूने रजत पदक तर मिकी युलेने १३०.६ गुण मिळवत कांस्य पदक जिंकले आहे.

 

हे ही वाचा :- 

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

 

Latest Posts

Don't Miss