Commonwealth Games 2022 : पी व्ही सिंघू ठरली सुवर्णपदकाची मानकरी, भारतासाठी ऐतिहासिक क्षण

Commonwealth Games 2022 : पी व्ही सिंघू ठरली सुवर्णपदकाची मानकरी, भारतासाठी ऐतिहासिक क्षण

Commonwealth Games 2022 : भारतीय महिला बॅडमिंटपटू पी व्ही सिंधूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण रचला आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूने अखेर बाजी मारली. 2014 व 2018 मध्ये सुवर्णपदकाने सिंधूला हुलकावणी दिली होती. पण, अखेर आता 2022 मध्ये तिने पहिले सुवर्णपदक जिंकून देशाचा मान राखला आहे. सायना नेहवालने 2010 व 2018मध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर महिला एकेरीत सुवर्ण जिंकणारी सिंधू ही दुसरी भारतीय महिला बॅडमिंटपटू ठरली. सिंधूच्या या यशानंतर भारताच्या सुवर्णपदकांची संख्या आता एकूण 19 झाली असून पदक तालिकेत भारताने न्यूझीलंडला मागे सोडून चौथ्या क्रमांक गाठला आहे.

हेही वाचा : 

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे “ही” अवस्था – रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण

Exit mobile version