spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

क्रिकेटचा समावेश आता ऑलिंपिक मध्येही; टी-२० ला IOC कडून मंजुरी

क्रिकेटचा समावेश आता ऑलिंपिक मध्येही; टी-२० ला IOC कडून मंजुरी

क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे,ऑलिम्पिकमध्ये आता टी-२० क्रिकेटचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता ऑलिम्पिकमध्ये टी-२० चा थरार रंगणार आहे, २०२८ च्या लॉसएंजेलिस ऑलिंपिकमध्ये टी-२० क्रिकेट चा समावेश करण्याची शिफारस IOC ने मान्य केली आहे. यामुळे जवळ जवळ १२८ वर्षांनी क्रिकेटचे पदार्पण परत ओलीम्पिकमध्ये झालेलं आहे. १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान मुंबईत पार पडलेल्या IOC अधिवेशनात यासंदर्भात मतदान घेण्यात आलं असून आता क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये अधिकृतरित्या समावेश झाला आहे.

१९०० मध्ये क्रिकेट हा ऑलिंपिक स्पर्धेचा एक भाग होता. त्यानंतर आता एका १२८ वर्षांनंतर क्रिकेटचं ऑलिम्पिकमध्ये पदार्पण झालं आहे.ऑलिंपिकमध्ये खेळले जाणारे क्रिकेट टी-२० फॉरमॅटमध्ये असेल. यासोबत स्क्वॅशला देखील २०२८ च्या ऑलिंपिक खेळाचा भाग बनवण्यात आला आहे. या पार पडलेल्या बैठकीत स्क्वॅश आणि क्रिकेट ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे .स्क्वॅश आणि क्रिकेटसह एकूण ५ खेळांचा यात समावेश करण्यात आला आहे.

या ऑलिंपिक मध्ये खेळला जाणारा क्रिकेट टी -२० फॉरमॅट मध्ये असेल असा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बोर्डाच्या शिफारशीला मान्यता दिल्यानंतर क्रिकेट संदर्भातील अंतिम निर्णय आयओसी सदस्यांच्या मतदानावर अवलंबून होता, सोमवारी १६ ऑक्टोबरला आयओसी सदस्यांनी मतदान करत ऑलिम्पिकमध्ये टी-२० क्रिकेट सामील करण्याच्या निर्णयाला संमती दिली आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची बोर्डाला शिफारस करताना आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक म्हणाले होते की, ‘नवीन खेळ ऑलिम्पिकला नवीन खेळाडू आणि चाहत्यांशी जोडण्यात मदत करतात’ म्हणूनया खेळाचा ऑलिंपिक मध्ये समावेश होणं हे खूप महत्त्वाचं आहे. यापूर्वी क्रिकेटचा समावेश १९०० साली पॅरिस ऑलिम्पिक मध्ये होता. त्यावेळी अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव ग्रेट ब्रिटन कडून करण्यात आला होता तसेच बेल्जियम आणि नेदरलँडने माघार घेतल्यानंतर हा एकमेव सामना होता.

हे ही वाचा : 

बनावट लग्नच रॅकेट उद्धवस्त, आरोपी महिला मुलीची आई

साडेतीन शक्तीपिठाचे राज्यातील एकमेव भगवती देवी मंदिर, नवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss