Nepal Sri Lanka दौऱ्यात क्रिकेट संघाची घोषणा, रोहित करणार संघाचं नेतृत्व

श्रीलंका दौऱ्यासाठी नेपाळ क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. नेपाळ श्रीलंका दौऱ्यात एकूण ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. रोहित पौडेल हा श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत नेपाळचं नेतृत्व करणार आहे.

Nepal Sri Lanka दौऱ्यात क्रिकेट संघाची घोषणा, रोहित करणार संघाचं नेतृत्व

नुकताच ३ सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी १९ सदस्य संघाची यादी जाहीर करण्यात आली. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आणि इंग्लड विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. तर सध्या टीम इंडिया ही विश्रांतीवर आहे. क्रिकेट प्रेमींना टीम इंडियाच्या सामन्यांसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. टीम इंडिया ही बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आणखी १९ दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यातच क्रिकेट विश्वातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी नेपाळ क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. नेपाळ श्रीलंका दौऱ्यात एकूण ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. रोहित पौडेल हा श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत नेपाळचं नेतृत्व करणार आहे. तर अर्जुन सौद यालाही संधी देण्यात आली आहे.

नेपाळ श्रीलंका डेव्हलपमेंट टीम विरुद्ध ही मालिका खेळणार आहे. नेपाळ क्रिकेट वर्ल्ड कप लीग २ आधी ही मालिका खेळणार आहे. त्यामुळे नेपाळसाठी ही मालिका क्रिकेट वर्ल्ड कप लीग २ साठी महत्त्वाची असणार आहे. या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा ३ सप्टेंबरला होणार आहे. तर ७ सप्टेंबरला अंतिम सामना होणार आहे. तर दुसरा सामना हा ५ तारखेला पार पडणार आहे. नेपाळ टीम या दरम्यान सर्व सामनेही खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी नेपाळ क्रिकेट टीमसाठी सदस्यांची नावे: रोहित पौडेल (कर्णधार) आसिफ शेख, कुशल भुर्तेल, सोमपाल कामी, ललित राजबंशी, देव खनाल, आरिफ शेख, कारण केसी, गुलशन झा, दीपेंद्र सिंग आयरी, अनिल साह, भीम शार्की, कुशल मल्ला, आकाश चंद, रिजन ढकल, संदीप जोरा, अर्जुन सौद, सागर ढकल आणि संदीप लामिछाने.

हे ही वाचा:

Exit mobile version