‘सीएसके’ चा कॅप्टन धोनी राहणार की जाणार? सीएसकेने घेतला मोठा निर्णय

पण आता 41 वर्षांचा धोनी पुन्हा मैदानात खेळताना दिसणार आहे

‘सीएसके’ चा कॅप्टन धोनी राहणार की जाणार? सीएसकेने घेतला मोठा निर्णय

आयपीएलची सुरुवात २००८ पासून झाली. तेव्हापासून चेन्नई टीमचा कर्णधार धोनीच होता. २०२२ आयपीएल सुरू होण्याआधी धोनीनं कर्णधारपद सोडलं.रविंद्र जडेजाकडे ही जबाबदारी देण्यात आली. मात्र टीमची कामगिरी चांगली होत नव्हती आणि जडेजाच्या खेळावरही परिणाम होत असल्याचं दिसत होतं. जडेजाने कर्णधारपद सोडलं. त्यानंतर धोनीकडे पुन्हा ही जबाबदारी आली. तसेच दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळत आहे. अशा स्थितीत धोनी पुढच्या सत्रातही खेळणार का? असा प्रश्न धोनीच्या चाहत्यांच्या मनात येत होता.

परंतु, धोनीच्या चाहत्यांना सुखावणारी एक महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे. चेन्नई फ्रँचायझीने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई सुपर किंग्ज (CSK)च्या कर्णधारपदी पुन्हा महेंद्रसिंह धोनी विराजमान होणार आहे. IPL २०२३ मध्ये चेन्नईचं कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीकडे असणार आहे. पुढच्यावर्षी देखील महेंद्रसिंह धोनी खेळताना दिसणार आहे. चेन्नई संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना विश्वनाथन यांनी सांगितले की, ‘महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएल हंगामात चेन्नई संघाचा कर्णधार असेल. या निर्णयामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही ते म्हणाले.

2008 साली आयपीएल सुरू झाले. तेव्हापासून धोनी चेन्नई संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्याने संघाला सर्वाधिक 4 वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. मात्र, 2022 आयपीएल सुरू होण्याआधी धोनीनं कर्णधारपद सोडलं. रविंद्र जडेजाकडे ही जबाबदारी देण्यात आली.जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने सुरुवातीच्या 8 सामन्यांपैकी केवळ 2 सामने जिंकले होते. त्यामुळे चेन्नई संघ प्लेऑफ्सपर्यंत देखील पोहोचू शकला नव्हता. त्यामुळे मग जडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा देत पुन्हा धोनीकडे नेतृत्व सोपवले.

पण आता 41 वर्षांचा धोनी पुन्हा मैदानात खेळताना दिसणार आहे आणि त्यातही तो चेन्नई सुपरकिंग्स संघाचा कर्णधार म्हणून खेळणार असल्यामुळे क्रिकेटप्रेमींना मोठा आनंद झाला आहे. सोशल मीडियावरही धोनीचे चाहत्यांकडून अभिनंदन केले जात आहे.

हे ही वाचा:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेत होणार महत्त्वाचे बदल

महानगरपालिकेच्या धोरणामुळे शिंदे गटाला घ्यावी लागणार माघार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version