बांग्लादेशचा १२० धावांवर डब्बा गूल, भारताचा दणदणीत विजय

सध्या भारताचा महिला क्रिकेट संघ बांग्लादेश दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) पार पडलेल्या टी-२० मालिकेमध्ये भारताच्या संघाने २-१ अशी बाजी मारली.

बांग्लादेशचा १२० धावांवर डब्बा गूल, भारताचा दणदणीत विजय

सध्या भारताचा महिला क्रिकेट संघ बांग्लादेश दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) पार पडलेल्या टी-२० मालिकेमध्ये भारताच्या संघाने २-१ अशी बाजी मारली. भारताच्या संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेश वूमन्सचा धुव्वा उडवलाय. आज बांगलादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करून २२९ धावांचे लक्ष उभे केले होते. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने ५२ धावांचे योगदान केले. तर भारताची युवा फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्स हिने भारतासाठी सर्वाधिक धावा करत ७८ चेंदूमध्ये ८६ धावा केल्या.

जेमिमाह रॉड्रिग्स हिने तिच्या फिरकीने बांगलादेशच्या फलंदाजांना १२० धावा रोखले. जेमिमाहने ३.१ ओवर टाकत बांगलादेशचे ४ गडी बाद केले. त्याचबरोबर ती कालच्या पाहिल्या वनडेमधे सामनावीर देखील ठरली. स्मृती मानधना हिने ५८ चेंडूमध्ये ३६ धावा केल्या. भारताच्या संघाने ३ सामान्यांच्या मालिकेमध्ये कालचा सामना जिंकून १-१ ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता तिसरा आणि अंतिम सामना हा रंगतदार होणार आहे.

वूमन्स बांगलादेश प्लेईंग इलेव्हन
मुर्शिदा खातून, शर्मीन अख्तर, फरगाना हक, निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), रितू मोनी, राबेया खान, लता मोंडल, नाहिदा अक्‍तर, फहिमा खातून, सुलताना खातून आणि मारुफा अक्‍टर.

वूमन्स टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन
हरमनप्रीत कौर (कर्णधार), प्रिया पुनिया, स्मृती मानधना, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, देविका वैद्य आणि मेघना सिंग.

हे ही वाचा:

Mumbai Local मधून प्रवास करणाऱ्यां ज्येष्ठांसाठी खूशखबर, आता…

लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल Gigi Hadid ला अटक

इर्शाळवाडी दुर्घटनेवर देवंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, अपघातग्रस्तांचा सर्व खर्च राज्य सरकार करणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version