spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

खरंच केली का ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी Ball tempering? पाकिस्तानचा माजी खेळाडू Basit Ali चे आरोप

सध्या जगामध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलकडे (World Test Championship Final) सर्वांचे लक्ष लागले आहे. आज वर्ल्ड टेस्ट चॅपियशीप चॅम्पियनशिप फायनलचा चौथा दिवस सुरु आहे.

सध्या जगामध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलकडे (World Test Championship Final) सर्वांचे लक्ष लागले आहे. आज वर्ल्ड टेस्ट चॅपियशीप चॅम्पियनशिप फायनलचा चौथा दिवस सुरु आहे. याचदरम्यान पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अली (Basit Ali) याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलध्ये बॉल टेम्परिंग (Ball tempering) झाल्याचा आरोप केला आहे. बासित अली याने ऑस्ट्रेलियाच्या संघावर गंभीर आरोप केले आहेत. बासित अली यांच्या मते विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांना ऑस्ट्रेलियाने हेराफेरी करुन बाद केले आहे असे पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अली याचे म्हणाले आहे.

बासित अली याने यूट्युब व्हिडीओकेला आहे त्यामध्ये त्याने हे ऑस्ट्रेलिया संघावर गंभीर आरोप केले आहेत. बासित अली याने पाकिस्तानसाठी १९ कसोटी सामने खेळले आहेत. तर ५० एकदिवसीय सामने खेळले आहेत. युट्युबवर केलेल्या व्हिडिओमध्ये बासित अली म्हणाला की, भारतीय संघाच्या १६ ते १८ षटकात चॅम्परिंग झाल्यासा सर्वात मोठा पुरावा आहे. १८ व्या षटकात पंच रिचर्ड कॅटलबोरो यांच्या सूचनेनंतर चेंडू बदलण्यात आला होता. १६, १७ आणि १८ वे षटक पाहिल्यास टेम्परिंग दिसून येईल. जेव्हा विराट कोहली बाद झाला त्या चेंडूची चमक पहा असे बासित म्हणाला.

पुढे बासित अली म्हणाला की, मैदानावर काय चालले आहे याबाबतीत कोणत्याही फलंदाजाला संशय आला नाही चेंडू सोडल्यानंतर लगेचच बोल्ड होणे हे एक उत्तम उदाहरण आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या प्लॅनला कोणीही पाहू शकले नाही हे चक्क होण्यासारखी बाब आहे. समालोचक आणि पंचांनाही ही बाब दिसली नाही. तिसरे पंच असो अथवा मैदानावर असणारे भारतीय फलंदाजांनाही समजले नाही. कुणीच ऑस्ट्रेलियाची टॅक्टिक्स पकडली नाही कमालीची गोष्ट आहे असे बासित म्हणाला.

पुढे बासित अली म्हणाला की, रवींद्र जडेजा ऑनसाईडला फटकावणार होता परंतु चेंडू ऑनसाईडला न पटवकावता चेंडू पॉइंटकडे गेला. या सर्व गोष्टी पंचांना दिसल्या नाही का? चेतेश्वर पुजाऱ्याच्या विकेटच्या संदर्भामध्ये बसितने संशय व्यक्त केला आहे. बासित ने व्हिडीओ मध्ये सांगितले आहे की, कॅमरुन ग्रीनने चेतेश्वर पुजाराला टाकलेल्या चेंडूची चमक पुराजाच्या दिशेने होती असे तो म्हणाला. ग्रीनने टाकलेला चेंडू आत आला आणि पुजारा क्लिन बोल्ड झाला. टेम्परिंग केल्याशिवाय चेंडू आत येऊच शकत नाही. ऑस्ट्रेलियाने टेम्परिंग केले आहे बीसीसीआयला ही बाब समजली नाही का ? ड्युक बॉल ४० षटकांपर्यंत रिवर्स स्विंग होत नाही, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आधीच कसा रिव्हर्स स्विंग केला..? त्याचबरोबर बशीत अली यांच्या आरोपानंतर आता ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन याचा बॉल घासतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा:

Sandipan Bhumre यांनी Chandrakant Khaire यांच्यावर केला सनसनाटी आरोप

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

RBI Governor Shaktikanta Das यांची केली मोठी घोषणा, कर्जाचा हप्ता वाढणार नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss