माजी हॉकीपटू दिलीप तिर्की सांभाळणार हॉकी इंडियाचा नव्या अध्यक्षाचा पदभार

माजी हॉकीपटू दिलीप तिर्की सांभाळणार हॉकी इंडियाचा नव्या अध्यक्षाचा पदभार

भारताच्या हॉकी संघाचे माजी कर्णधार दिलीप तिर्की यांची हॉकी इंडियाचा नव्या कर्णधार अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. भारताच्या माजी हॉकी कर्णधार आणि ऑलिंपिकपटू दिलीप तिर्कीची आज हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून तिर्की यांची बिनविरोध निवड झाली आहे. हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी अर्ज तिर्की आहे.

दिलीप तिर्की यांची हॉकी इंडियाच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती

ओडिशातील ४४  वर्षीय टिर्की यांनी १९९६ अटलांटा, २०००  सिडनी आणि २००४ अथेन्स ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. हॉकी इंडियाच्या निवडणुका ९ ऑक्टोबरपर्यंत होणार होत्या. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ आणि प्रशासकीय समितीने ऑगस्टमध्ये ही मुदत दिली होती.

अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली

तिर्की निवडून येण्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हॉकी इंडिया सीओएच्या अधिकारक्षेत्रात होती. अध्यक्ष झाल्यानंतर टिर्की यांनी सीओए आणि इतर सदस्यांचे आभार मानले. FIH ने लॉसनेच्या एका पत्रात तिर्की यांचे हॉकी इंडियाचे अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. हॉकी इंडिया वेबसाइट आणि भारतातील मीडिया रिपोर्ट्सद्वारे FIH निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.

Exit mobile version