spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुलगा भारतीय संघासाठी खेळू लागला आहे तेव्हापासून आपण त्याची गोलंदाजी पाहत नाही; अर्शदीप सिंगची आई

माजी कर्णधार विराट कोहलीने केलेली निर्णायक खेळी, हार्दिक पंड्याचं अष्टपैलू योगदान आणि त्यापूर्वी युवा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंगने केलेला भेदक मारा तीन गोष्टींच्या जीवावर भारतीय संघाने टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयारंभ केला. रविवारी ‘अव्वल १२’ फेरीच्या थरारक सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर चार गडी राखून सरशी साधली. या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये म्हणजेच भारतीय संघाच्या गोलंदाजीच्या वेळेस सामन्याचा हिरो ठरला अर्शदीप. खरं तर अर्शदीपला मागील काही महिने हे फारच चढ उतार असणारे गेले.

टी-२० आशिया चषक स्पर्धेमध्ये त्याने आसिफ अलीचा झेल सोडला होता. त्यानंतर आसिफनेच पाकिस्तानला भारताविरोधात विजय मिळवून दिला होता. या पराभवानंतर अर्शदीपला भारतीय चाहत्यांनी बरंच ट्रोल केलं होतं. काहींनी तर अगदी टोकाची भूमिका घेत खलिस्तानी वगैरे टीकाही केली होती. या कामगिरीचा वचपा अर्शदीपने पाकिस्तान विरुद्धच्या विश्वचषकाच्या सामन्यात काढला. आपल्या चार षटकांमध्ये अर्शदीपने ३२ धावा देत चार फलंदाज बाद केले. अर्शदीपने बाद केलेल्या तीन फलंदाजांमध्ये टी-२० क्रिकेटमधील सध्याचा अव्वल फलंदाज मोहम्मद रिजवान आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचाही समावेश होता. आझमला तर पहिल्याच चेंडूवर अर्शदीपने पायचित केले. बाबर आझमला भोपळाही फोडता आला नाही. अर्शदीपने भारताच्या विजयामध्ये मोलाची भूमिका पार पाडला.

अर्शदीपच्या या कामगिरीमुळे त्याचे आई-वडील फारच समाधानी आहेत. अर्शदीपची आहे बलजीत कौर आपल्या मुलाची गोलंदाजी फारच क्वचित पाहते. बलजीत कौर यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये यामागील कारण सांगितलं आहे. जेव्हापासून मुलगा भारतीय संघासाठी खेळू लागला आहे तेव्हापासून आपण त्याची गोलंदाजी पाहत नाही असं बलजीत कौर सांगतात. सामना सुरु असताना बलजीत या गुरुद्वारेत असतात किंवा गुरुनानक देव यांच्या फोटोसमोर प्रार्थना करत असतात. बलजीत कौर यांनी, “तेव्हा तो पहिल्यांदा भारतीय संघासाठी खेळला तेव्हापासून मी हे करते. तो नेहमी सर्वात धोकादायक षटक फेकतो. मला खेळाबद्दल फार कळत नाही. मात्र फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर धावा काढताना मला पाहणं कठीण जातं. म्हणून मी तो गोलंदाजी करताना पाहतच नाही,” असं सांगितलं. सुमार कामगिरी झाली आणि मुलाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं की अर्शदीपच्या आई-वडीलांना फार त्रास होतो. अर्शदीपचे वडील दर्शन सिंग यांनी, “मी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. मात्र ती (बलजीत) हे सारं मनावर घेते. इंटरनेटवर अर्शदीपविरुद्ध काही चुकीची गोष्ट लिहिल्याचं तिने पाहिलं तर ती रडते. मी तिला अनेकदा समजावून सांगितलं आहे की आपण हे सारं थांबवू शकत नाही,” असं सांगितलं.

हे ही वाचा :

राज्य सरकार योग्य उपाययोजना करताना दिसत नाही- शरद पवार

Ramdas Kadam : ‘ज्याला कावीळ असते त्याला जग पिवळं दिसतं’, ठाकरेंच्या दौऱ्यावरून रामदास कदमांचं टीकास्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss