FIFA World Cup 2022 अर्जेंटिनाच्या दमदार कामगिरीच्या मागे ‘हे’ पेय आहे का? मेस्सीचा फोटो होतोय व्हायरल

FIFA World Cup 2022 अर्जेंटिनाच्या दमदार कामगिरीच्या मागे ‘हे’ पेय आहे का? मेस्सीचा फोटो होतोय व्हायरल

FIFA World Cup 2022 : अर्जेंटिना (Argentina) आता फुटबॉलचा विश्वविजेता आहे. रविवारी रात्री ३६ वर्षांचा दुष्काळ संपवून अर्जेंटिनाने विश्वचषक आपल्या नावावर केला. हा विजय अनेक अर्थांनी खास होता. पण, सर्वात जास्त चर्चा झाली ती लिओनेल मेस्सीची (Lionel Messi). कारण, हा त्याचा शेवटचा विश्वचषक होता. त्याला गोल्डन बॉल देण्यात आला. त्याने या स्पर्धेत एकूण ७ गोल केले. अशा प्रकारे त्यांनी स्वतःचे आणि देशाचे स्वप्न पूर्ण केले. लिओनेल मेस्सी विश्वचषक विजेता बनणे तसे चर्चेत नाही. तर त्यांच्या विजयाचे रहस्यही उलगडले आहे. अर्जेंटिनाच्या विजयामागे खास पेय (drink) आहे. हे पेय सामान्य पेय नाही. यामुळे अर्जेंटिना विश्वविजेता ठरला आहे.

सोशल मीडिया (Social media), व्हॉट्सॲप स्टेटस (Whatsapp status) सर्वत्र अर्जेंटिना आणि लिओनेल मेस्सीची जोरदार चर्चा आहे. यासोबतच लोक अर्जेंटिनाच्या संघाची एनर्जी आणि खेळाचे खूप कौतुक करत आहेत. अर्जेंटिनाच्या या विजयामध्ये खेळांडूचा उत्साह आणि एनर्जीमागे आणखी एक कारण आहे. एक ड्रिंक अर्जेंटिना संघाच्या चांगल्या कामगिरीचे कारण असल्याचे मानले जात आहे. हे ड्रिंक कोणतं आहे आणि याचा अर्जेंटिनाच्या यशामागे याचा संबंध काय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. हे पेय स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्यासह अर्जेंटिना संघातील प्रत्येक खेळाडूची आवडती ड्रिंक आहे. ही ड्रिंक अर्जेंटिनाच्या संघासाठी एवढी खास आहे की, या ड्रिंकचा ५ क्विंटलचा साठा घेऊन अर्जेंटीना संघ कतारला पोहोचला. येथे दिलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की मेस्सीच्या हातामध्ये एक ड्रिंक आहे. ही ड्रिंक खूप खास आहे.

या खास पेयाचं (Drink) नाव आहे येरबा माटे. येरबा माटे (Yerba Mate) एक हर्बल ड्रिंक (Harbal Drink) आहे. हे पेय अमेरिकन खेळाडूंमध्ये खूप लोकप्रिय आहे. हे पेय यरबा माटे नावाच्या वनस्पतीपासून तयार करण्यात येतं. यरबा माटे ही दक्षिण अमेरिकेमध्ये आढळणारी एक विशेष प्रकारची वनस्पती आहे. येरबा माटे (Yerba Mate Drink) एक प्रकारचा चहा आहे. याला एक खास प्रकारचा काढाही म्हणता येईल.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्री खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघाले आहेत का?, नाना पटोले

FIFA World Cup ट्रॉफीचे अनावरण करत दीपिका पादुकोणने रचला इतिहास, मात्र या कारणामुळे अभिनेत्री झाली पुन्हा ट्रोल

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version