जाणून घ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये नक्की कोणता देश आहे कोणत्या स्थानावर…

भारताने आतापर्यंत 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदके जिंकली आहेत. भारताने टॉप १० मध्ये आपले स्थान निश्चित केले

जाणून घ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये नक्की कोणता देश आहे कोणत्या स्थानावर…

भारताने आतापर्यंत 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदके जिंकली आहेत

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022चा काल दुसरा दिवस पूर्ण झाला आहे. शनिवारी 30 जुलैला खेळांच्या दुसऱ्या दिवशी भारतानं वेटलिफ्टिंगच्या मदतीने सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक जिंकलं आणि याच पदकांच्या जोरावर भारतानेही आपलं खातं उघडलं आहे. अशा प्रकारे भारतीय संघानं कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मेडल टॅलीमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर या मेडल टॅलीमध्ये ऑस्ट्रेलियाने जलतरणाच्या जोरावर एकूण 13 सुवर्णपदकांसह प्रथम स्थान पटकावलं आहे. शनिवारी भारताने वेटलिफ्टिंगच्या चारही स्पर्धांमध्ये पदकांसह पदार्पण केले. भारताने आतापर्यंत 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदके जिंकली आहेत. भारताने टॉप १० मध्ये आपले स्थान निश्चित केले असून सध्या भारत आठव्या स्थानावर आहे. स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने 49 किलो गटात भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकले.

ऑस्ट्रेलिया ३२ पदकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. सुवर्ण आणि एकूण पदकांच्या यादीत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या यशाचे एक कारण म्हणजे जलतरण आहे. ज्यामध्ये त्यांना ८ सुवर्णांसह एकूण २२ पदके मिळाली आहेत. या मेडल टॅलीत न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर असून इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत एकूण ११५ पदकांचे वितरण करण्यात आले असून त्यात 22 देशांनी आपले खाते उघडले आहे.

२१ वर्षीय वेटलिफ्टर संकेत सरगरने याने ५५ किलो गटात भारतासाठी पहिले पदक जिंकले म्हणजे रौप्य पदक जिंकले. यानंतर गुरुराजा पुजारीने पुरुषांमध्ये ६१ किलो गटात कांस्यपदक जिंकले. मीराबाई चानूने तिसरे पदक म्हणजे सुवर्ण पडक जिंकले आणि सलग तिसरे पदक जिंकून तिची यशोगाथा सुरू ठेवली. त्यानंतर दिवसाच्या शेवटच्या स्पर्धेत बिंदियारानीने महिलांच्या ५५ ​​किलोमध्ये २०२ किलो वजनासह रौप्यपदक जिंकले आणि भारतासाठी दिवसाचा शेवट चांगला केला.

Exit mobile version