तलवारबाजीमध्ये आशियाई स्पर्धेमध्ये कास्यपदक जिंकणारी पहिली भारतीय

भारतामधील तलवारबाजी करणारी सीए भवानी देवी (CA Bhavani Devi) हिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताची मान उंचाने डोलावली आहे अशी कामगिरी करणारी भवानी देवी ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

तलवारबाजीमध्ये आशियाई स्पर्धेमध्ये कास्यपदक जिंकणारी पहिली भारतीय

भारतामधील तलवारबाजी करणारी सीए भवानी देवी (CA Bhavani Devi) हिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताची मान उंचाने डोलावली आहे अशी कामगिरी करणारी भवानी देवी ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. आशियाई स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत भारताच्या सी ए भवानी देवीला उझबेकिस्तानच्या झान्याब दायीबेकोव्हाकडून संघर्षपूर्ण लढतीत १४-१५ असा पराभवाचा सामना करावा लागला. याआधी भवानी देवीने जपानची जागतिक विजेती मिसाकी मुरा हीच १५-१० असा सनसनाटी प्रभाव करत उपांत्य फेरी गाठली होती . मिसाकीने जागतिक तलवारबाजी स्पर्धेमधील सैबर प्रकारामध्ये २०२२ मध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

भवानी देवीचा मिसाकीच्या विरोधात नोंदवलेला हा पहिलाच विजय ठरला आहे. भारताच्या २९ वर्षीय भवानी देवीला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या फेरीत भवानी देवीने कझाकस्तानच्या डॉस्पे करिनाचा पराभव केले. त्यांनतर उप- उपांत्यपूर्व फेरीत भवनीने तिसऱ्या व मानांकित ओझाकी सेरपीचे आव्हान १५-११ असे सहज संपुष्टात आणले. भवानी देवीच्या या कामगिरीचे भारतीय तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष राजीव मेहता यांनी अभिनंदन केले आहे. राजीव मेहता म्हणाले की, “तलवारबाजी कीड प्रकारात भारतासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे. आजपर्यत कुठंल्या खेळाडूला जमले नाही ते भवानीने करून दाखवले. आशियाई स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे मी तिचे अभिनंदन करतो.

भवानी देवीची कामगिरी पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भवानी देवीचे कौतुक केले आहे आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भवानी देवीने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित की आहे. चॅम्पियनशिपच्या इंडिव्ह्युजअल इवेंटमध्येही भवानीच्या नावावर एका कांस्य पदक आहे. भवानी देवीनं २०१० च्या एशियन तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्येही तिनं कांस्यपदक जिंकलं होतं.

हे ही वाचा:

Ashadhi Wari 2023, मुक्ताबाईंच्या पालखीचा विसावा वाकवड येथे तर धंदेवाडीत नाथांच्या पालखीचे उभे रिंगण

Mumbai Police यांच्याकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, खोके दिन, गद्दार दिन साजरा…

Ashadhi Ekadashi 2023, आजपासून निघणार आषाढी यात्रेसाठी देवाचा पलंग…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version