Pele dies : फुटबॉलचे जादूगार पेले यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

Pele dies : फुटबॉलचे जादूगार पेले यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे शतकातील महान फुटबॉलपटू, तीन वेळा वर्ल्ड कप जिंकणारे एकमेव खेळाडू पेले यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82व्या वर्षी पेले यांनी शेवटचा श्वास घेतला. पेले यांना कोलन कँसर झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, फुटबॉलचं मैदान गाजवणारा हा खेळाडू कँन्सरविरोधातील झुंज हरला. गुरुवारी २९ डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे केवळ फुटबॉल जगतावरच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींवर शोककळा पसरली आहे.

२० व्या शतकातील महान फुटबॉलपटू पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी आणि हृदय फेल झालं होतं. त्यामुळे त्यांची दिवसे न् दिवस प्रकृती खालावत चालली होती. पेले यांना डॉक्टरांच्या खास पथकाच्या निगरानी खाली ठेवण्यात आलं होतं. मात्र, अखेर त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे केवळ फुटबॉल जगतावरच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींवर शोककळा पसरली आहे.

 

फुटबॉलच्या अभ्यासकांच्या मते पेले हे २० व्या शतकातील महान फुटबॉलर होते. त्यांनी ब्राझीलला (brazil) फुटबॉल खेळाच्या माध्यमातून नावारूपाला आणले. साओ पोल (sao Polo) पासून सुरवात झालेल्या फ़ुटबाँल खेळाचे नंतर ते ग्लोबल ऍबसिडर (global ambassador) देखील झाले. पेले यांच्या कॅपटन शिपमध्ये ब्राझील ने १९५८,१९६२ आणि १९७० साली विश्वचषक जिंकला होता. संपूर्ण फुटबॉलपटू पैकी कोणाला हि त्यांचा रेकॉर्ड (record) तोडता आलेला नाही. त्यांनी ब्राझीलकडून ७७ गोल केले होते. नुकत्याच पार पडलेल्या फिफा (fifa) वर्ल्ड कप मध्ये नेमारने त्यांच्या राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केले होती.

 

पेले याचे खरे नाव ‘एड्सन अरांतेस दो नासिमेंतो तथा पेले’ असे होते. त्यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी मिनास गेराइस, ट्रेस कोरासी येथे झाला होता. त्यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने शतकातील अथलीट म्हणून घोषित केले आणि २० व्या शतकातील १०० सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींच्या वेळेच्या यादीमध्ये त्याचा समावेश केला. भ्रष्टचार , हुकूमशाही असण्याऱ्या देशात त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या १७ व्य वर्षी विश्वचषक जिकून त्यांनी ब्राझीलची नोंद फुटबॉल यादीत केली होती. २००० मध्ये, पेले यांना आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहास आणि सांख्यिकी महासंघ (IFFHS) द्वारे शतकातील जागतिक खेळाडू म्हणून त्यांची निवड करण्यात आली.

Exit mobile version