spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी घेतला एम एस धोनीसोबत गोल्फचा आनंद, व्हिडीओ व्हायरल…

टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधारा महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) निवृत्त झाला असला तरीसुद्धा त्याची अजुनही तितकीच क्रेज आहे.

टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधारा महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) निवृत्त झाला असला तरीसुद्धा त्याची अजुनही तितकीच क्रेज आहे. धोनीला क्रिकेटला रामराम करून ३ वर्षे झाली आहेत. मात्र आयपीएलमध्ये (IPL) धोनीचा जलवा सर्वांनीच पाहिला असून त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते स्टेडिअममध्ये गर्दी करतात. धोनी जगभर प्रसिद्ध असून आता तो अमेरिकेमध्ये (America) सट्ट्यांसाठी गेला आहे. अमेरिकेतील धोनी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प (Donald Trump) यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी धोनासोबत गोल्फ (Golf) खेळण्यासाठी आयोजन केलं होतं. धोनीलाही गोल्फ खेळायलाही खूप आवडतं. धोनी यूएस ओपन २०२३ (US Open 2023) मध्ये कार्लोस अल्काराज (Carlos Alcaraz) आणि झ्वेरेव (Zverev) यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीची (quarter-final) मॅच पाहण्यासाठी आला होता. महेंद्रसिंग धोनीचे जवळचे उद्योगपती हितेश संघवी (Hitesh Sanghvi) यांनी इंन्टाग्रामवर शेअर केला आहे. धोनी, डोनाल्ड ट्रम्प आणि राजीव नाईक (Rajeev Naik) यांच्यासोबत गोल्फ खेळताना, माजी राष्ट्रपतींनी गोल्फचं आयोजन केलं त्याबद्दल सिंंघवी यांनी आभार व्यक्त केले.

धोनाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यंदाच्या इंडिअन प्रीमिअर लीगमध्ये (Indian Premier League) धोनीला चांगलाच पाठिंबा मिळाला. कोणत्याही मैदानावर सामना असूदेत धोनीला भरभरून प्रेम दिलं. चेन्नईच्या (Chennai) मैदानावर सामना नसला तरीसुद्धा संपूर्ण स्टेडिअममध्ये चाहते धोनीसाठी गर्दी करत होते. दरम्यान, माहीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने २००७ मध्ये टी-२०, २०११ साली वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ साली चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. त्यासोबतच धोनीने सीएसकेला (CSK) सर्वाधिक पाचवेळा आयपीएलची ट्रॉफी (IPL trophy) उंचावून दिली आहे.

हे ही वाचा: 

तलाठी परीक्षा घोटाळ्यातील आरोपीला अटक करताच पोलिसांना थेट मंत्रालयातून फोन सुरू…

Asia Cup 2023 IND vs PAK, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत एक मोठा निर्णय, पाऊस आला तरी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss