spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gautam Gambhir यांचे पत्रकार परिषदेत स्पष्ट वक्तव्य, २०२७ चा वर्ल्ड कप Virat आणि Rohit खेळणार पण….

२७ जुलै पासून भारतीय संघाची श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी बऱ्याच प्रश्नांची उत्तर दिली. यामध्ये त्यांनी स्पष्टपणे उत्तर देऊन निर्माण झालेले बरेच गैरसमज दूर केले आहेत. तसेच इतर सपोर्ट स्टाफ ची देखील घोषणा केली आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या भविष्यावर स्पष्ट वक्तव्य केले आहे.

त्याचप्रमाणे भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफ मध्ये नेदरलँडचा अनुभवी खेळाडू रायन टेन डोशेटचाही समावेश असू शकेल याची माहिती गौतम गंभीर यांनी दिली आहे. सहाय्यक प्रशिक्षकाबाबत सुद्धा त्याने खुलासा केला आहे. परंतु श्रीलंका दौऱ्यानंतरच सपोर्ट स्टाफ ची घोषणा केली जाईल असे गंभीरने स्पष्ट सांगितलेय. त्याचप्रमाणे, रोहित शर्मा आणि विराट कोहली २०२७ मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळणार का? अशी विचारणा केल्यानंतर उत्तरात भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले की, रोहित आणि विराट फिटनेस ने ठीक असतील तर ते नक्कीच खेळतील.

संघामध्ये रोहित शर्मा नंतर सूर्यकुमार यादव याला टी२० फॉरमॅट मध्ये भारतीय संघाचे कर्णधार पद दिले गेले आहे आणि तो फक्त टी२० फॉरमॅट मधेच कर्णधार पद सांभाळेल अशी माहिती दिली आहे पण तो तिन्ही फॉरमॅट मध्ये खेळू शकेल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच रवींद्र जडेजा बद्दल बोलताना त्याला संघातून वगळले नसून त्याला विश्रांती दिली आहे असे सांगितले आहे .त्याचसोबत शुभमन गिल चे गेले काही दिवस फार चढाव उतारांनी भरले होते परंतु तो तिन्ही फॉरमॅट मध्ये खेळणार आहे स्पष्ट सांगितले आहे आणि मोहम्मद शमी ज्याच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो बांगलादेशविरुद्ध कसोटीत परतणार असल्याची माहिती गंभीर यांनी दिली आहे.

Latest Posts

Don't Miss