spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ऋषभ पंतच्या फॅन्ससाठी खुशखबर, ‘या’ दिवशी मिळणार डिस्चार्ज

भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. रस्ता अपघातात जखमी झालेला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असून या आठवड्यात त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) मिळू शकतो. ३० डिसेंबर रोजी दिल्लीहून रुरकीला जात असताना झालेल्या अपघातात पंत गंभीर जखमी झाले होते. त्यांची कार दुभाजकाला धडकून उलटली. यानंतर आग लागली. कसेबसे पंतने गाडीतून बाहेर पडून आपला जीव वाचवला. तेव्हापासून तो रुग्णालयात आहे. मात्र महिनाभर रुग्णालयात राहिल्यानंतर तो आता घरी परतण्याच्या तयारीत आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “ऋषभ पंत वेगाने बरा होत आहे. आम्हाला वैद्यकीय पथकाकडून चांगली बातमी मिळाली आहे. त्याच्या गुडघ्याच्या लिगामेंटची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. हेच सर्वांना ऐकायचे होते. या आठवड्यात त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.” मात्र, पुढील महिन्यात पंतला पुन्हा रुग्णालयात जावे लागणार आहे. त्याच्या उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटला झालेल्या दुखापतीवर दुसरी शस्त्रक्रिया होणार आहे. रस्ता अपघातात त्यांच्या उजव्या गुडघ्याचे ३ लिगामेंट तुटले. यातून दीची शस्त्रक्रिया झाली आहे. महिनाभरानंतर त्याला पुन्हा रुग्णालयात यावे लागेल.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “पंतला एका महिन्यात आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागेल. दुसरी शस्त्रक्रिया केव्हा करणे योग्य आहे हे डॉक्टर ठरवतील. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक डॉक्टर दिनशॉ परडीवाला आणि पंत यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णालयाच्या सतत संपर्कात आहे. तो लवकरच मैदानात परतेल अशी आशा आहे. दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर पंतला पूर्णपणे बरे होण्यासाठी सुमारे ४-५ महिने लागतील. यानंतर त्याचे पुनर्वसन आणि प्रशिक्षण सुरू होईल. पूर्णपणे सराव सुरू होण्यासाठी त्याला तंदुरुस्त होण्यासाठी आणखी २ महिने लागतील. अशा स्थितीत त्याची यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची शक्यता नगण्य आहे.

हे ही वाचा:

अनुष्का शर्मानंतर हरमनप्रीत कौर बनणार प्युमा स्पोर्ट्स ब्रँडची नवी अॅम्बेसेडर

‘Pathaan’ चित्रपटाच्या दमदार यशानंतर दीपिका – शाहरुखने दिली पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss