spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी Team India साठी आनंदाची बातमी; टीम इंडियाच्या संघातील सहा खेळाडूंची नावे टॉप 10 यादीत…

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांची होणारी कसोटी मालिका महत्त्वाची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०१५ च्या अंतिम फेरीचं गणित या मालिकेवर अवलंबून असणार आहे. भारताने ही मालिका २-० ने जिंकली तर पुढचं गणित सोपं होणार आहे. अन्यथा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेशने पाकिस्तानचा २-० ने धुव्वा उडवला असल्याने आत्मविश्वास व्दिगुणित झालेला आहे. असं असूनही आयसीसीच्या क्रमवारीने बांगलादेशला घाम फुटला आहे. कारण भारताचे टॉप सहा खेळाडू आयसीसी क्रमवारीतील टॉप टेनमध्ये सामील आहेत. तीन खेळाडू फलंदाजांच्या यादीत आणि तीन खेळाडू गोलंदाजीच्या यादीत आहेत. त्याकारणामुळे बांगलादेशचा भारताविरूद्धचा लढा पाकिस्तानसाठी सोपा आणि सहज होणार नाही. कारण या सहा खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं तर विरुद्ध संघाला कठीण होऊन जाणार आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा जो रूट हा खेळाडू अव्वल स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुसऱ्या आणि डॅरिल मिशेल तिसऱ्या तसेच ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ चौथ्या स्थानावर आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. यशस्वी जयस्वाल सहाव्या आणि विराट कोहली सातव्या क्रमांकावर आहे. तर गोलंदाजांच्या यादीत आर. अश्विन अव्वल स्थानी आहे. तर जसप्रीत बुमराह तिसऱ्या आणि रवींद्र जडेजा सातव्या स्थानावर आहे. टीम इंडियाने फेब्रुवारी महिन्यापासून एकही कसोटी सामना खेळला नाही.

टॉप -१० फलंदाजांची यादी
जो रूट (इंग्लंड)- ८९९ रेटिंग
केन विल्यमसन (न्यूझीलंड)- ८५९ रेटिंग
डॅरिल मिशेल (न्यूझीलंड)- ७६८ रेटिंग
स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)- ७५७ रेटिंग
रोहित शर्मा (भारत)- ७५१ रेटिंग
यशस्वी जयस्वाल (भारत)- ७४० रेटिंग
विराट कोहली (भारत)- ७३७ रेटिंग
उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)- ७२८ रेटिंग
मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)- ७२० रेटिंग
मार्नस लॅबुशेन (ऑस्ट्रेलिया)- ७२० रेटिंग

टॉप-१० गोलंदाजांची यादी
आर. अश्विन (भारत)- ८७० रेटिंग
जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया) – ८४७ रेटिंग
जसप्रीत बुमराह (भारत)- ८४७ रेटिंग
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)- ८२० रेटिंग
कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)- ८३४ रेटिंग
नॅथन लिऑन (ऑस्ट्रेलिया)- ८०१ रेटिंग
रवींद्र जडेजा (भारत)- ७८८ रेटिंग
काइल जेमिसन (न्यूझीलंड)- ७२९ रेटिंग
मॅट हेन्री (न्यूझीलंड)- ७११ रेटिंग
शाहीद आफ्रिदी (पाकिस्तान)- ७०९ रेटिंग

Latest Posts

Don't Miss