टीम इंडियासाठी खुशखबर; ‘हा’ खेळाडू खेळणार विश्वचषकात !

टीम इंडियासाठी खुशखबर; ‘हा’ खेळाडू खेळणार विश्वचषकात !

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० World Cup आधी टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अद्याप टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर गेला नाही. टी-२० विश्वचषकात खेळण्याच्या आशा अजूनही कायम आहेत. दोन आठवड्यांनंतर ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह विश्वचषकात खेळण्याची शक्यता कायम आहे असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं संकेत दिले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना सौरव गांगुलीनं जसप्रीत बुमराहबाबत आशा कायम आहेत. तो विश्वचषकात खेळू शकतो, असे वक्तव्य केले आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेदरम्यानही बुमराहच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. बुमराह या मालिकेतील पहिला टी-२० सामना खेळू शकला नाही. यानंतर बुमराहने मालिकेतील दोन सामन्यांमध्ये खेळला. बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातून बाहेर गेला. पाठदुखीमुळे बुमराहला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आल्याचे बीसीसीआयने अपडेट जारी केले. जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर बीसीसीआय लक्ष ठेवून आहे. त्याशिवाय त्याची दुखापत लवकर बरी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळेच बीसीसीआयनं अद्याप जसप्रीत बुमराहच्या बदली गोलंदाजाचं नाव जाहीर केले नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराह अद्याप विश्वचषकात खेळण्याची आशा कायम असल्याचं वृत्त आहे.

जसप्रीत बुमराह सध्या बेंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये फिटनेसवर काम करत आहे. एनसीएमध्ये त्याच्या फिटनेसवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. जसप्रीत बुमराह विश्वचषकात खेळण्याची शक्यता कायम आहे. मेडिकल टीम जसप्रीत बुमराहच्या फिटनेस चाचण्या आणि स्कॅन घेऊन त्यावर काम करत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह पाच ऑक्टोबर रोजी टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याची शक्यता कमी आहे. पण जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरला तर नंतर ऑस्ट्रेलियामध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच निवड समितीकडून जसप्रीत बुमराच्या बदली खेळाडूची घोषणा करण्यास येत नाही.

भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा आधीच गुडघ्याच्या दुखापतीमुळं संघाबाहेर आहे. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळं संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाला सुद्धा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकावं लागलंय. त्यानंतर आता जसप्रीत बुमराहच्या दुखपतीनं टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. बीसीसीआयमधील सुत्रांच्या माहितीनुसार, दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह विश्वचषक खेळण्याची शक्यता नाही. बुमराहच्या दुखापतीनं भारताच्या चिंतेत भर पडली आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंचे ‘विश्वासू’ देखील शिंदे गटात जाणार ?

Raj Thackeray : राज ठाकरे शिर्डी विमानतळावर दाखल

Follow Us

Exit mobile version