spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Hardik Pandya Emotional : आमच्यासाठी आई बापाने घर सोडलं…; हर्दिक पांड्याचे पाणावले डोळे

भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) T20 विश्वचषक सामन्यात भारतानं ४ विकेट्सनी विजय मिळवला असून या सामन्यात हार्दिक पांड्यानं बॉल आणि बॅट दोन्हीने कमाल केल्याचं पाहायला मिळालं. आधी गोलंदाजीत ३ विकेट्स घेतल्यातर फलंदाजीत महत्त्वूपूर्ण ४० रन केले. पण या विजयानंतर मात्र हार्दिक कमालीचा भावूक झाल्याचं दिसला. त्याने या आनंदाच्या प्रसंगी आपल्या वडिलांची आठवण काढली.

भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) T20 विश्वचषक सामन्यात भारतानं ४ विकेट्सनी विजय मिळवला असून या सामन्यात हार्दिक पांड्यानं बॉल आणि बॅट दोन्हीने कमाल केल्याचं पाहायला मिळालं. आधी गोलंदाजीत ३ विकेट्स घेतल्यातर फलंदाजीत महत्त्वूपूर्ण ४० रन केले. पण या विजयानंतर मात्र हार्दिक कमालीचा भावूक झाल्याचं दिसला. त्याने या आनंदाच्या प्रसंगी आपल्या वडिलांची आठवण काढली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 हालाखीच्या परिस्थितीतून इथवर आलेल्या हार्दिकला या विजयानंतर त्याच्या घरातल्यांनी त्याच्या क्रिकेटसाठी घेतलेली मेहनत आठवली आणि मग काय तो मैदानातच रडला. यावेळी रडताना हार्दिकने त्याच्या घरच्यांनी त्याच्या क्रिकेटसाठी घेतलेली मेहनत आणि केलेल्या बलिदानाची आठवण केली. हार्दिक पांड्या आपली खेळी वडिलांना समर्पित करत म्हणाला की, ‘माझ्या वडिलांनी खूप त्याग केला आहे. फक्त मुलांसाठी एका शहरातून आपलं सगळं विकून दुसऱ्या शहरात येणं. मी हे करूच शकत नाही. मी माझ्या मुलावर खूप प्रेम करतो. त्याच्यासाठी सर्व काही करेन. मात्र माझ्या वडिलांनी दोन्ही मुलं ६ वर्षाची असताना सगळं सोडून येणं हा खूप मोठा त्याग आहे. मी कायम त्यांचा ऋणी राहीन.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

 भारत १५९ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला आणि सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा प्रत्येकी ४ धावा करुन तंबूत परतले. त्यानंतर सूर्यकुमारही १५ धावा करुन बाद झाला. मग अक्षर २ धावांवर धावचीत झाला आणि ५० धावांच्या आतच भारताचे 4 गडी परतले. त्यानंतर मात्र विराट आणि पांड्या यांनी एक हाती डाव सावरत एक तगडी भागिदारी उभारली. दोघांनी मिळून ११३ रनांची विक्रमी भागिदारी केली, ज्यानंतर ४० रनामवर पांड्या बाद झाला. सामन्याचा सामनावीर विराट कोहलीने २३ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी केली आणि भारताला विजयश्री मिळवून दिला. विशेष म्हणजे भारताने T 20 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध केलेली ही सर्वात मोठी भागिदारी ठरली.

Latest Posts

Don't Miss