spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

घटस्फोटाची घोषणा करत Hardik Pandya यांनी केले चाहत्यांना आवाहन

गेले काही दिवस या अष्टपैलू क्रिकेटवीर हार्दिक पंड्या आणि बॉलिवूड अभिनेत्री नतासा स्टेनकोविक यांच्या  घटस्फोटाविषयी मोठ्याप्रमाणावर चर्चा रंगात होत्या. अखेर या चर्च्यांचा अंत हार्दिक पंड्या यांनी घटस्फोटाविषयी विशेष माहिती इंस्टग्राम अकाउंटवरून रात्री दिली आहे. अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने गुरुवारी त्याची पत्नी आणि अभिनेत्री नतासा स्टॅनकोविचसोबत घटस्फोटाच्या अफवांना पुष्टी दिली आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नतासा स्टेनकोविकनं (Natasa Stankovic) घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे. दोघांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याची घोषणा केली आहे. हार्दिक आणि नतासा यांच्या घटस्फोटाची T20 वर्ल्डकप पूर्वीपासून चर्चा सुरु होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.

हार्दिक पंड्या आणि नतासा यांनी २०२० साली लग्न केलं होतं. त्याचवर्षी त्यांना अगस्त्य हा मुलगा झाला. अगस्त्यचं संगोपन आम्ही दोघंही करु. तो आमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. त्याला आनंदी ठेवण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करु असं या दोघांनीही त्यावेळी जाहीर केलं होत.

त्या पोस्टमध्ये नक्की काय लिहिले होते ?

हार्दिकने स्वत: पोस्ट करून ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तो काय म्हणाला ते जाणून घेऊ –

“मी आणि नतासानं ४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर परस्पर सहमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्र राहण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. या नात्याला आपलं सर्वस्व दिलं. हा आमच्यासाठी एक कठीण निर्णय होता. आम्हाला एकमेकांपासून मिळालेला आनंद, सन्मान आणि सहकार्य याचा विचार करुन हा निर्णय घेणं दोघांच्याही हिताचं होतं. आम्हाला अगस्त्याचा आशीर्वाद मिळाला आहे. तो आमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू असेल. त्याच्या आनंदासाठी आम्ही आम्हाला शक्य आहे ते सर्व करु. या अवघड आणि नाजूक परिस्थितीमध्ये तुम्ही आमच्या गोपनियतेचा आदर राखाल याची आम्हाला आशा आहे.”

हे ही वाचा:

CM Shinde मुंबईकडे पैसे काढण्याचं यंत्र म्हणून पाहतात, पण आमच्यासाठी आमची Mumbai…Aaditya Thackeray यांचा सरकारवर निशाणा

Navi Mumbai NH 3: ॲक्सेस कंट्रोल मार्गामुळे शहरातून बाहेर पडण्यासाठी लागणार फक्त १५ मिनिटे, शहरांतर्गत वाहतूक आता होणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss