spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आशिया चषक २०२२ मध्ये भारताचे किती सामने असतील?, पाकिस्तानविरुद्ध किती सामने रंगतील ? जाणून माहिती

आशिया चषक २०२२ चा हंगाम शनिवार म्हणजेच २७ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणार आहे. आणि याचे अंतिम सामने हे १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती UAE मध्ये सुरू होत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २८ ऑगस्ट रोजी दुबईमध्ये होणार आहे. दोन्ही देशांचे क्रीडाप्रेमी या सामन्याची वाट पाहत आहेत.. भारत आणि पाकिस्तान संघ २८ ऑगस्टला एकमेकांविरुद्ध पहिला सामना खेळणार आहेत.

आशिया कप क्वालिफायर सामने सुरू झाले आहेत. तर गट सामने २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत, आशिया चषकाचे वेळापत्रक, वेळ, कुठे आणि कधी पाहावे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या संदर्भात माहित जाणून घ्या

घरच्याघरी सोप्या पद्धती वापरून करा… बाप्पाचे डेकोरेशन

किती संघ असतील?

आशिया कपमध्ये ६ संघ सहभागी होत आहेत. हे दोन गटात विभागलेले आहेत. भारत आणि पाकिस्तान अ गटात आहेत. तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहेत. पात्रता फेरीतून एक संघ निवडला जाईल. २१ ऑगस्टपासून हाँगकाँग, यूएई, कुवेत आणि सिंगापूर या ४ संघांमधील क्वालिफायर सामने सुरू झाले आहेत. पात्रता फेरीतील विजेता संघ भारत-पाकिस्तान गटात असेल.

किती सामने खेळले जातील?

६ संघांमध्ये एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत. यातील १० सामने दुबईत तर तीन सामने शारजाहमध्ये होणार आहेत. यामध्ये ग्रुप स्टेजमधील सर्व संघांमध्ये एकूण 6 सामने खेळवले जाणार आहेत. यानंतर टॉप-२ संघ सुपर-४ मध्ये पोहोचतील, जिथे सर्व संघ एकमेकांविरुद्ध ६ सामने खेळतील. त्यानंत सुपर-४ मधील टॉप-२ संघ अंतिम फेरीत विजेतेपदाचा सामना खेळतील. अशा स्थितीत स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३ सामने पाहायला मिळू शकतात.

 लाइव्ह स्ट्रीमिंग कोठे पाहायचे?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२२ सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर

हेही वाचा : 

टिकटॉक स्टार असलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे निधन

Latest Posts

Don't Miss