‘माझा श्वास थांबला होता’, पहिल्यांदाच टीम इंडियात सामील झाल्यानंतर हा युवा वेगवान गोलंदाज झाला भावूक

३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत-श्रीलंका टी-२० मालिकेत तो भारतीय संघाचा भाग आहे. त्याला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळते की नाही, हा नंतरचा विषय आहे, पण सध्या त्याच्या निवडीमुळे शिवम खूप खूश आहे.

‘माझा श्वास थांबला होता’, पहिल्यांदाच टीम इंडियात सामील झाल्यानंतर हा युवा वेगवान गोलंदाज झाला भावूक

देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या शिवम मावीसाठी डिसेंबर महिना दुहेरी आनंदाचा होता. सर्वप्रथम, आयपीएल २०२३ च्या मिनी लिलावात त्याला ६ कोटी मिळाले. दुसरे म्हणजे पहिल्यांदाच त्याची टीम इंडियात निवड झाली. ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत-श्रीलंका टी-२० मालिकेत तो भारतीय संघाचा भाग आहे. त्याला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळते की नाही, हा नंतरचा विषय आहे, पण सध्या त्याच्या निवडीमुळे शिवम खूप खूश आहे.

क्रिकइन्फोशी झालेल्या संभाषणात शिवमने त्याच्या निवडीबद्दल कळले तेव्हाचे क्षण शेअर केले. शिवमने सांगितले की, ‘आम्ही जेव्हा डोमेस्टिक क्रिकेट खेळतो तेव्हा रात्री लवकर झोपायला जातो जेणेकरून आम्हाला पुरेशी विश्रांती मिळेल, पण त्या दिवशी टीम इंडियाची निवड होणार होती, त्यामुळे मी समर्थसोबत सौरभ भैय्याच्या खोलीत बसलो होतो. माझ्या निवडीबद्दल कळताच क्षणभर सगळं थांबलं. तो एक संस्मरणीय क्षण होता. मी भावूक झालो होतो पण माझी वेळ येणार हे मला माहीत होतं.

२४ वर्षीय शिवम मावी २०१८ पासून सतत आयपीएल खेळत आहे. आतापर्यंत त्याने ३२ सामन्यांत ३० विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची गोलंदाजीची सरासरी ३१.४० आणि इकॉनॉमी रेट ८.३१ आहे. आयपीएल २०२२ मध्ये तो पूर्णपणे बेरंग होता. त्याला ६ सामन्यात फक्त ५ विकेट घेता आल्या होत्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट देखील १० पेक्षा जास्त होता. अशा स्थितीत त्याला केकेआरनेही सोडले. मात्र, देशांतर्गत टूर्नामेंट सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ६.६४ इकॉनॉमीसह ७ सामन्यात १० विकेट घेत त्याने आयपीएलमध्ये मोठी किंमत तर मिळवलीच पण टीम इंडियातही स्थान मिळवले. शिवमने टीम इंडियात त्याच्या निवडीचे श्रेय त्याच्या आई-वडिलांना दिले. तो म्हणाला, ‘त्यांच्या (आई-वडिलांच्या) त्यागशिवाय हे शक्य झाले नसते. माझ्या निवडीची बातमी ऐकून तेही भावूक झाले होते. त्यांनी नेहमीच माझा आत्मविश्वास वाढवला आणि माझ्यावर विश्वास ठेवला.

हे ही वाचा:

ठरलं तर मग ! शिवशक्ती आणि भीमशक्ती येणार एकत्र

उर्फीच्या वादात उडी घेतलेल्या सुषमा अंधारेंवर अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांनी सोडले बाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version