ICC T 20 World Cup 2024: PM मोदींची भेट घेण्यासाठी भारतीय संघ निवासस्थानी हजर

ICC T 20 World Cup 2024: PM मोदींची भेट घेण्यासाठी भारतीय संघ निवासस्थानी हजर

भारतीय क्रिकेट टीमने बारबाडोस मध्ये साऊथ आफ्रिका संघासोबत  आयसीसी T २० वर्ल्ड कप २०२४ (ICC T 20 World Cup २०२४) चा अंतिम सामना जिंकून भारताचा झेंडा फडकावला. आज 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ पाच दिवसांनी भारतात दाखल झाला आहे. दिल्ली विमानतळावर पोहोचताच भारतीय संघाचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. भारतीय संघ दिल्लीला उशिरा पोहचल्यामुळे त्यांना आराम करायला फार कमी वेळ मिळाला. आज भारतीय   संघ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मोदींशी भेट झाल्यांनतर टीम इंडिया मुंबईसाठी रवाना होणार आहे. बीसीसीआयने वानखेडे स्टेडियम येथे मरीन ड्राइव्हला रोड शो चे आयोजन केले आहे. भारतीय संघासोबत बीसीसीआयनचे सचिव जय शाह सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत.

टीम इंडियाच्या सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. टीम इंडियाचे सर्व खेळाडू मोदींना भेटण्यासाठी भारतीय संघाच्या गणवेशात पोहचले होते. नरेंद्र मोदींनी टीम इंडियाचे स्वागत करताना त्यांचं भरभरून कौतुकही केले. टीम इंडिया आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान त्यांच्या चर्चा चांगल्याच रमल्या होत्या. जवळपास दीड तास मोदींनी विश्व विजेत्या खेळाडूंशी चर्चा केली. तसेच नरेंद्र मोदींनी विश्वचषक ट्रॉफी आणि सर्व खेळाडूंसह फोटो काढले. विश्वचषकातील काही आठवणी सांगताना टीम इंडियाचे खेळाडू आणि नरेंद्र मोदी यांचे काही फोटो समोर आले आहेत.

मोदींची भेट घेतल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मुंबईसाठी रवाना झाले आहेत. टीम इंडिया मुंबईत परत आल्यानंतर त्यांची व्हिक्टरी परेड होणार आहे. मरीन ड्राइव्ह ते वानखेडे हा मुंबईतील व्हिक्टरी परेडचा मार्ग असणार आहे. संध्याकाळी ५ वाजता निघणाऱ्या या परेडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जवळपास दोन तास ही व्हिक्टरी परेड चालण्याची शक्यता आहे. एका बसमधून ही व्हिक्टरी परेड काढण्यात येणार आहे. सर्व चाहता वर्ग भारतीय संघाला पाहण्यासाठी उत्सुक असून त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

हे ही वाचा:

Health Is Wealth : Smart Phone ठरतोय घातक ; हातावर होतोय वाईट परिणाम

Nana Patole लढवणार MCA ची निवडणूक, ट्विट करत दिली माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version