Friday, July 5, 2024

Latest Posts

ICC T20 WORLD CUP 2024 : Narendra Modi यांनी तब्बल दीड तास टीम इंडियाशी साधली चर्चा ; काय घडलं या चर्चेत ?

विश्व विजेत्या टीम इंडियाचं गुरुवारी ४ जुलै रोजी नवी दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाच्या खेळाडूंचं विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर टीम इंडिया काही तासांच्या विश्रांतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेली. पंतप्रधान मोदी आणि टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली

जगातला सर्वात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. हा खेळ अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत खेळला जातो. त्यात हा खेळ म्हणजे अगदी आबालवृद्धांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात सध्या हा विशेष सामना फार जोमाने सुरु आहे. अगदी सर्व मंडळी हा सामना झाडून पाहत आहेत. तो म्हणजे टी २० विश्वचषक २०२४ (ICC T20 World cup 2024)  हा होय. हा टी २० विश्वचषक २ जून २०२४ रोजी सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा स्फोटक फंलदाज विराट कोहली (Virat Kohali), वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah), अक्षर पटेल आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी मोलाची कामगिरी केली. यांच्या योगदानामुळेच भारताला विजयाला गवसणी घालता आली. तब्बल १७ वर्षांनी हे टी-२० विश्वचषक २०२४ भारताने पटकावले आहे. टी 20 वर्ल्ड कप विजयी टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी ४ जुलै रोजी भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान मोदी आणि टीम इंडियात काय काय चर्चा झाली ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. एका अर्थी ही चांगलीच गोष्ट घडली की भारताकडे हा विश्वचषक परतला. पण हा विजयोत्सव कदाचित राजकीय कार्यक्रम (Political Events) विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेला असावा असा अंदाज बांधता येऊ शकतो.

विश्व विजेत्या टीम इंडियाचं गुरुवारी ४ जुलै रोजी नवी दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाच्या खेळाडूंचं विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर टीम इंडिया काही तासांच्या विश्रांतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेली. पंतप्रधान मोदी आणि टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. त्यानंतर टीम इंडिया मुंबईच्या दिशेने निघाली. मुंबईत टीम इंडियाच्या खेळाडूंची ओपन डेकबसमधून नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर वानखेडे स्टेडिममध्ये पुढील कार्यक्रम पार पडला. मुंबई क्रिकेट चाहत्यांनी या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी तुफान गर्दी केली होती. मात्र पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे हा सर्व कार्यक्रम चोखपणे पार पडला. मात्र यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कोणत्या विषयावर बोलणं झालं ? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना होती. अखेर सर्व काही स्पष्ट झालंय.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंसह वन टू वन संवाद साधला. पंतप्रधानांनी प्रत्येक खेळाडूची वैयक्तिक चौकशी केली. तसेच वर्ल्ड कप फायनल सामन्यात त्या क्षणी काय काय झालं? त्या क्षणी तुमच्या डोक्यात काय सुरु होतं? असं सर्वकाही मोदींनी विचारलं. यावर प्रत्येक खेळाडूंनी आपली भावना व्यक्त केली.

दरम्यान, रोहित शर्माप्रमाणेच नरेंद्र मोदींनी विराट कोहली आणि अक्षर पटेललाही असेच प्रश्न केले. “अंतिम सामन्यापूर्वी तुझ्याकडून फार कमी धावा झाल्या होत्या. अशा स्थितीत अंतिम सामन्याला सामोरा जाताना तुझ्या मनात काय चाललं होतं?” असा प्रश्न मोदींनी विराट कोहलीला केला. अक्षर पटेलला अंतिम सामन्यात फलंदाजीच्या क्रमात बढती देण्यात आली होती. त्यासंदर्भात मोदींनी अक्षर पटेललाही विचारणा केली.

कर्णधार रोहित शर्माला नरेंद्र मोदिंनी एक खास प्रश्न विचारला. अंतिम सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मानं मैदानावरची चिमुटभर माती चाखली होती. या प्रसंगाचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यासंदर्भात मोदींनी रोहित शर्माला यावेळी प्रश्न विचारला. “त्या दिवशी मैदानावरची माती तू चाखलीस. त्या मातीची चव कशी होती रोहित?” असा प्रश्न या भेटीत मोदींनी रोहित शर्माला विचारला. या प्रश्नावर रोहित शर्मानं फक्त अर्थपूर्ण स्मितहास्य करून उत्तर दिलं. यावेळी वातावरण भावनिक झाल्याचं दिसून आलं.

सोबतच एक मोठी बातमी हाती आली आहे. येत्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यानंतर काय आता त्याची तयारी कशी करणार असा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी राहुल द्रविड यांना विचारला. कारण येत्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला आशा आहे यापैकी अनेक खेळाडू हे त्या संघाचा भाग असतील. त्यामुळे मला खात्री आहे की, यातील अनेक खेळाडू त्यामध्ये दर्जेदार कामगिरी करतील.

 

हे ही वाचा:

 

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा जाहीर करा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

 

Latest Posts

Don't Miss