Tuesday, July 2, 2024

Latest Posts

ICC T20 World Cup 2024: पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये South Africa ची बाजी, असा रंगला ‘ऐतिहासिक’ सामना

दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२४ (ICC T20 World Cup 2024) स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये २७ जून रोजी अफगाणिस्तानवर ९ विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने ७ वेळा अपयशी ठरल्यानंतर अखेर ८ व्या वेळी वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२४ (ICC T20 World Cup 2024) स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये २७ जून रोजी अफगाणिस्तानवर ९ विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने ७ वेळा अपयशी ठरल्यानंतर अखेर ८ व्या वेळी वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी करून उपांत्य फेरीतून स्थान मिळवणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाला पहिल्या उपांत्य सामन्यात काहीच खास कामगिरी करता आली नाही. अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ५७ धावांचं आव्हान दिले होते. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान ८.५ ओव्हरमध्ये १ विकेट गमवून ६० धावांनी पूर्ण केले. यासह आफ्रिकेने ९ गडी आणि ६७ चेंडू राखून विजय साकारला.

दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याने ५ धावा केल्या तर रीझा हेंड्रिक्स (Reeza Hendricks) आणि कर्णधार एडन मार्कराम (Aiden Markram) या जोडीने नाबाद २३ धावा करून आपल्या संघाला विजयापर्यंत पोहचवले. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान (Rashid Khan) याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानला १२ ओव्हरही खेळात आले नाही. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला ५६ धावांवर गुंडाळलं. अफगाणिस्तानसाठी एकट्या अझमतुल्लाह उमरझाई (Azmatullah Omarzai) याने दुहेरी आकडा गाठला. अझमतुल्लाहने सर्वाधिक १० धावा केल्या. अझमतुल्लाह हा दुहेरी आकडा पार करणारा एकमेव फलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या घटक गोलंदाजासमोर कोणत्याच फलंदाजाचा टिकाव लागला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅन्सन (Marco Jansen) आणि तबरेझ शम्सी (Tabraiz Shamsi) या दोघांनी ३-३ विकेट्स मिळवल्या तर कागिसो रबाडा (Kagiso Rabada)आणि ॲनरिक नॉर्टजे (Anrich Nortje) या दोघांच्या खात्यात २-२ विकेट्स गेल्या.

आज (दि. २७ जून २०२४) भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरी २ हा सामना होणार आहे. यातील विजयी संघ दक्षिण आफ्रिकेसोबत २९ जून रोजी बारबाडोस येथे किताबासाठी मैदानात असेल. ह्या सामन्यात कोणता संघ विजय पत्करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा

Atul Bhatkhalkar यांनी सांगितले ३ मिनिटांच्या भेटीचे गमक

‘ना ना करते प्यार …’ Uddhav Thackeray यांची Devendra Fadnavis यांच्या भेटीनंतर मोठी प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss