Monday, July 8, 2024

Latest Posts

ICC T20 WORLD CUP 2024 : विजयी मुलाला भेटण्याची आईची आतुरता पोहोचली शिगेला ; डॉक्टरांची अपॉइमेन्ट केली कॅन्सल.

सर्व खेळाडूंनी हा आनंद आपल्या घरच्यांसोबत साजराकरण्यासाठी गेले. त्याचप्रमाणे रोहित शर्मा यांनीही आपल्या आईची भेट घेतली. यावेळी त्याचे डोळे पाणावले होते. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील न विसरता येणारा क्षण होता. 

जगातला सर्वात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. हा खेळ अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत खेळला जातो. त्यात हा खेळ म्हणजे अगदी आबालवृद्धांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात सध्या हा विशेष सामना फार जोमाने सुरु आहे. अगदी सर्व मंडळी हा सामना झाडून पाहत आहेत. तो म्हणजे टी २० विश्वचषक २०२४ (ICC T20 World cup 2024)  हा होय. हा टी २० विश्वचषक २ जून २०२४ रोजी सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा स्फोटक फंलदाज विराट कोहली (Virat Kohali), वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah), अक्षर पटेल आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी मोलाची कामगिरी केली. यांच्या योगदानामुळेच भारताला विजयाला गवसणी घालता आली. तब्बल १७ वर्षांनी हे टी-२० विश्वचषक २०२४ भारताने पटकावले आहे.

काल म्हणजे ४ जुलै रोजी भारतीय संघाच्या विजयाचे लोन सर्वत्र पसरले होते.  टीम इंडिया काळ मुंबईत दाखल झाली. त्यांनतर त्यांचं मोठ्याप्रमाणावर आगतस्वागत करण्यात आलं. नरेंद्र मोदी याची तर त्यांचे स्वागत केलेच परंतु यांच्या स्वागतासाठी सारे क्रिकेटप्रेमी झाडून आले होते. त्याचप्रमाणे येथे मोठ्याप्रमाणावर चेंगराचेंगरी सुद्धा झाली. भारतीय संघ मुंबईत परतल्यावर सर्वप्रथम त्यांनी मोदी यांची भेट घेतली. त्यांनतर त्यांची व्हिक्टरी परेड नारीमन पॉइंट येथे झाली. त्यांनतर वानखेडे स्टेडियममध्ये पुन्हा टीम इंडियाचं चाहत्यांकडून धामधुमीत स्वागत करण्यात आलं. यांनतर सर्व खेळाडूंनी हा आनंद आपल्या घरच्यांसोबत साजराकरण्यासाठी गेले. त्याचप्रमाणे रोहित शर्मा यांनीही आपल्या आईची भेट घेतली. यावेळी त्याचे डोळे पाणावले होते. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील न विसरता येणारा क्षण होता.

रोहित शर्मा अनेक दिवसांपासून घराबाहेर होते. २०२४ मधील टी20 वर्ल्ड कप चँपियन बनण्यासाठी त्यांनी जवळपास महिनाभर तरी ते न्यूयॉर्क आणि वेस्ट इंडिजमध्ये होते. वर्ल्ड कपवर नाव कोरून जेव्हा ते  भारतीय संघासोबत मायदेशी परतले तेव्हा त्याच्या स्वागतासाठी लाखो फॅन्स मुंबईच्या रस्त्यावर उतरले होते. त्याचवेळी रोहित यांची आई देखील तिथे उपस्थित होती. आपल्या मुलाला मिळणार अपरिमित प्रेम पाहून त्यांना भरून आलं. रोहित यांना पाहण्यासाठी, त्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. तेव्हाच त्यांच्या आईने आपल्या लाडक्या लेकाना मिठा मारत, गालावार, कपाळावर पापा घेत त्यांचे लाड केले. या प्रसंगी त्यांचे वडीलही उपस्थित होते.

प्रत्येक भारतीयाप्रमाणे ४ जुलै हा दिवस रोहित शर्मा यांच्या पालकांसाठी अभिमानाने भरलेला होता. अखेर त्यांचा मुलगा वर्ल्ड चॅम्पियन बनून परतला आणि संपूर्ण देश त्याला सलाम करत होता. या दोघांनीही अनेक दिवस आपल्या मुलाला पाहिले नव्हते. त्यामुळे तेही मुलाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पोहोचले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रोहितची आई पूर्णिमा शर्मा (Purnima sharma) यांनी सांगितले की, “त्याची तब्येत ठीक नाही आणि डॉक्टरांची अपॉईंटमेंट ठरली होती. पण त्यांना आपल्या मुलाचा खास क्षण, त्याचं होणारं कौतुक चुकवायचं नव्हतं. शर्मा कुटुंबीय बऱ्याच दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होते. त्यामुळे या आनंदात सामील होण्यासाठी पूर्णिमा शर्मा या स्टेडियमवर आल्या होत्या. वर्ल्डकपला जाण्यापूर्वी असा दिवस बघायला मिळेल असा विचारही केला नव्हता,” असे रोहित यांच्या आईने सांगितले.

हे ही वाचा:

 

T20 WORLD CUP : TEAM INDIA च्या स्वागतासाठी क्रिकेटचाहत्यांचा लोटला जनसागर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss