ICC T20 World Cup 2024: वानखेडे स्टेडिअमवर हार्दिक पांड्याच्या नावाचा जयघोष, ज्या मैदानात डिवचलं, तिथेच…

भारताने टी २० वर्ल्ड कप स्पर्धेवर १७ वर्षांनी आणि आयसीसी चषकवर ११ वर्षांनी नाव कोरले आहे. २००७ साली भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा जेतेपद जिंकलं होतं. त्यानंतर आता २०२४ साली रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने विजय मिळवला आहे.

ICC T20 World Cup 2024: वानखेडे स्टेडिअमवर हार्दिक पांड्याच्या नावाचा जयघोष, ज्या मैदानात डिवचलं, तिथेच…

भारताने टी २० वर्ल्ड कप स्पर्धेवर १७ वर्षांनी आणि आयसीसी चषकवर ११ वर्षांनी नाव कोरले आहे. २००७ साली भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा जेतेपद जिंकलं होतं. त्यानंतर आता २०२४ साली रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. भारताने दुसऱ्यांदा टी २० वर्ल्ड कप जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १७७ धावांचं आव्हान दिले होतं. मात्र, दक्षिण आफ्रिका या संघाला फक्त १६९ धाव करता आल्या. भारताने हा सामना ७ धावांनी जिंकत विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.

टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत विजेतेपद मिळण्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा सिंहाचा वाटा आहे. दक्षिण आफ्रिकेचा पाच षटकात ३०धावांची गरज होती. यात हार्दिक पांड्याने दोन षटके टाकली. तसेच त्याने दोन महत्वाचे विकेट्स घेतल्या. यामुळे टीम इंडियाचा विजयाचा मार्ग सुकर झाला. १७ वं षटक टाकताना हार्दिक पांड्याने पहिल्याच चेंडूवर क्लासची विकेट घेतली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकासंघ बॅकफूटवर गेला. आणि शेवटचे षटक पुन्हा एकदा हार्दिकच्या हाती सोपवण्यात आले. ही दोन षटके भारताच्या विजयासाठी महत्वाची ठरली.

दोन महिन्यांपूर्वी हार्दिक पंड्याला डिवचणारे आता त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. वानखेडे आणि मारिन ड्राइव्हवर जमलेला जनसमुदाय हार्दिक पांड्याचा जयघोष करत आहेत. त्यामुळे चाहत्यांचे एक वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. आयपीएल मध्ये जितका अपमान झाला त्याच्या दुप्पट कौतुकास पात्र ठरला आहे. टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत विजेतेपदास मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा सिंहाचा वाटा आहे. हार्दिक पांड्याने टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. हाय वानखेडे स्टेडिअमवर चाहत्यांनी डिवचलं होतं त्याच मैदानावर आता त्याच्या नावाचा जयघोष होत आहे.

हे ही वाचा:

राजकीय वर्तुळात आता येणार नवे वळण ; VASANT MORE घेणार ठाकरेंची भेट !

MAHARASHTRA LEGISLATIVE COUNCIL ELECTION 2024 : विधान परिषदेत १५ आमदार होणार निवृत्त ; नवे तीन सदस्य निवडणूक जिंकून परतणार सभागृहात
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version