ICC वुमन्स टी 20 वर्ल्डकप वेळापत्रक जाहीर; भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने

भारतीय महिला संघाचा पहिला सामना हा ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ येत्या ६ ऑक्टोबरला आमनेसामने असणार आहे.

ICC वुमन्स टी 20 वर्ल्डकप वेळापत्रक जाहीर; भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने

आयसीसी (ICC) वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. ही स्पर्धा याआधी बांगलादेशमध्ये होणार होती. पण बांगलादेशमध्ये काही दिवसांपूर्वी राजकीय घडामोडी झाल्या आणि तिथले सर्व चित्रच बदलले. बांगलादेशमधील राजकीय स्थिती आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे तिथे स्पर्धा आयोजित करणे कठीण होऊन बसले असते. त्यामुळे आयसीसीने ही स्पर्धा UAE मध्ये भरवण्याचा निर्णय घेतला. आता ही स्पर्धा शारजाह क्रिकेट स्टेडियम आणि दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहे.

आता या स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना ३ ऑक्टोबरला बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे. तर भारतीय महिला संघाचा पहिला सामना हा ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ येत्या ६ ऑक्टोबरला आमनेसामने असणार आहे. या स्पर्धेतील एकूण २३ सामने होणार असून अंतिम सामना २० ऑक्टोबरला होण्याचे जाहीर झाले आहे.

आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धावेळापत्रक:

हे ही वाचा:

Lalbaugcha Raja Visarjan 2024: ‘गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Hezbollah Pager Blasts: पेजर म्हणजे नेमकं काय? पेजरला हॅक करता येतं का?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version