आता आयपीएलचा लिलाव झाला असता तर ‘या’ खेळाडूला विकत घेण्यासाठी पैसे नसले असते, गौतम गंभीरने व्यक्त केले आश्चर्य

शनाका इतका महागडा विकला गेला असता की त्याला विकत घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते.

आता आयपीएलचा लिलाव झाला असता तर ‘या’ खेळाडूला विकत घेण्यासाठी पैसे नसले असते, गौतम गंभीरने व्यक्त केले आश्चर्य

भारत विरुद्धच्या दुसऱ्या टी२० (T20) सामन्यात (IND vs SL), श्रीलंका संघाचा कर्णधार दासुन शनाकाने २५३.५५ च्या स्ट्राईक रेटने भारतीय गोलंदाजांचा मारा केला आणि २२ चेंडूत ५६ धावा केल्या. यासह शनाकाने सामन्याच्या शेवटच्या षटकात केवळ ४ धावा खर्च केल्या, ज्याच्या जोरावर श्रीलंकेने १६ धावांनी विजय मिळवला. पण या खेळाडूला आयपीएल २०२३ च्या लिलावात एकही खरेदीदार सापडला नाही. नुकतेच, लखनऊ सुपर जायंट्सचे मार्गदर्शक गौतम गंभीर यांनी याबाबत मोठे विधान केले आणि आयपीएल लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने त्याला विकत घेतले नसल्याची खंत व्यक्त केली.

खरं तर, भारत आणि श्रीलंका (IND vs SL) विरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या टी२० (T20) मालिकेत सध्या दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. दुसऱ्या टी२० (T20) सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने धडाकेबाज खेळी करत टीम इंडियाचा १६ धावांनी पराभव केला. त्याने बॅट आणि बॉल दोन्हीसह मैदानावर महत्त्वपूर्ण योगदान दिले.

यावेळी आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरने आयपीएल लिलावात दासुन शनाकाला एकही खरेदीदार न मिळाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. आयपीएल २०२३च्या (IPL 2023) लिलावामध्ये दासुन शनाकाला कोणत्याही फ्रँचायजीने विकत घेतले नव्हते, ज्याबद्दल गौतम गंभीरने आता मोठे वक्तव्य केले आहे. गौतम म्हणाला की जर दासुन शनाकाची कामगिरी लिलावापूर्वी आली असती तर कोणत्याही फ्रँचायझीकडे त्याला विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे नसले असते.

स्टार स्पोर्ट्सवर आपले मत मांडताना गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला, “शनाका इतका महागडा विकला गेला असता की त्याला विकत घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती वाखाणण्याजोगी आहे. जर ही मालिका आयपीएल लिलावापूर्वी लागली असती तर काही फ्रँचायझींकडे शनाकाला विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे नसते कारण तो खूप महागडा विकला गेला असता.

हे ही वाचा:

चेतन शर्मा पुन्हा निवड समितीचे अध्यक्ष, ‘या’ माजी क्रिकेटपटूंच्या नावांवर BCCIचा शिक्कामोर्तब

Tunisha Sharma प्रकरणातील शिझान खानच्या जामिनावरील सुनावणी होणार ९ जानेवारीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version