spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मला धक्काच बसला आणि आश्चर्यही वाटले, IPL लिलावात विकला न गेल्याने ‘या’ वेगवान गोलंदाजाने व्यक्त केले आश्चर्य

मला वाटले होते की काही संघ माझ्यावर बोली लावतील. खरे सांगायचे तर, मला न विकले जाण्याची अपेक्षा नव्हती. मला समजले नाही.

इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावाने (IPL Auction) काही खेळाडूंना काही दिवसांतच करोडपती बनवले आहे. लिलाव संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तरुण खेळाडूंचा मोठ्या रकमेसाठी लिलाव झाला तर काही अनुभवी खेळाडू आयपीएल लिलावात (IPL Auction विकले गेले नाहीआणि त्यामुळे त्यांची क्रिकेट कारकीर्द संपली की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. आता अशीच एक चर्चा सुरू झाली असून आयपीएलच्या अनुभवी वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला संदीप शर्मा (Sandeep Sharma) या मिनी लिलावात विकला गेला नाही, जो निर्णय अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा होता.

२३ डिसेंबर रोजी झालेल्या आयपीएल मिनी लिलावात (IPL Mini Auction) संदीप शर्माला विकत घेण्यात कोणत्याही फ्रँचायझीला रस नव्हता. यानंतर प्रतिक्रिया देणारा अनुभवी वेगवान गोलंदाज संदीप शर्मा (Sandeep Sharma) म्हणाला की, मला खूप आश्चर्य वाटले आणि दुःखही झाले आहे. “मी का विकला गेलो नाही हे मला समजत नाही. मी खेळलेल्या प्रत्येक संघासाठी मी चांगली कामगिरी केली आहे. मला वाटले होते की काही संघ माझ्यावर बोली लावतील. खरे सांगायचे तर, मला न विकले जाण्याची अपेक्षा नव्हती. मला समजले नाही. कुठे, काय चूक झाली. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत “मी चांगली कामगिरी केली. रणजी करंडक स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत मी ७ विकेट घेतल्या. मी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही चांगला खेळलॊ,” संदीप शर्मा म्हणाला.

आयपीएल क्रिकेटच्या इतिहासात संदीप शर्माने सातत्याने विकेट घेत लक्ष वेधून घेतले. आयपीएल स्पर्धेत त्याने कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व केले हे महत्त्वाचे नाही, विकेट घेण्याच्या बाबतीत संदीप शर्मा कधीही मागे राहिला नाही. संदीप शर्माने १०४ कसोटी सामन्यांमध्ये ७.७७ च्या इकॉनॉमी रेटने ११४ विकेट घेतल्या.कोची येथे झालेल्या मिनी लिलावात संदीप शर्माची मूळ किंमत ५० लाख रुपये ठेवण्यात आली होती. मात्र, १० पैकी एकाही फ्रँचायझीला संदीप शर्माला खरेदी करण्यात रस नव्हता. असे असले तरी संदीप शर्माला आयपीएल खेळण्याचे दरवाजे बंद झालेले नाहीत. कारण कोणताही गोलंदाज दुखापतग्रस्त होऊन आयपीएलमधून बाहेर पडला, तर त्याला बदली खेळाडू म्हणून आयपीएल संघात घेण्याची संधी असते.

आयपीएल मिनी लिलावासाठी एकूण ४०५ खेळाडू आपले नशीब आजमावण्यासाठी पुढे आले होते. यापैकी ८० खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. ८० खेळाडूंपैकी ५१ खेळाडू भारतीय तर २९ विदेशी खेळाडू होते. शुक्रवारी झालेल्या मिनी लिलावात पंजाब किंग्ज फ्रँचायझीने सॅम कुरनला १८.५० कोटी रुपयांना विकत घेतले.

हे ही वाचा:

वाढत्या कोरोना संसर्गातही चीन हटवणार निर्बंध, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ८ जानेवारीपासून खुल्या करणार सीमा

PM Modiचे भाऊ प्रवास करत असलेल्या कारचा मोठा अपघात, अपघातात प्रल्हाद मोदी गंभीर जखमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss