IPL2023, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर

हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील गतविजेता गुजरात टायटन्सचा (gujarat titans) संघ यंदाही गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर स्वार आहे.

IPL2023, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर

हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील गतविजेता गुजरात टायटन्सचा (gujarat titans) संघ यंदाही गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर स्वार आहे. गुजरातच्या संघाने दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पहिल्याच सामन्यांमध्ये गुजरातने चेन्नईचा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यांमध्ये दिल्लीचा पराभव केला. सांघिक कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. चार गुणांसह गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेमध्ये राजस्थान रॉयलचा (Rajasthan Royal) संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आरसीबी (RCB) तिसऱ्या आणि लखनौ संघ चौथ्या क्रमांकावर आहे.

लखनौ संघाला एक विजय तर एक पराभव मिळाला आहे. एम एस धोनीचा (MS Dhoni) संघ चेन्नई सुपर किंग ने एक सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर एक सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेमध्ये तळाशी हैदराबादचा संघ आहे. पहिल्याच सामन्यात हैदराबाद संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांचा नेट रनरेट घसरला आहे. त्यामुळे ते आता सध्या तळाशी आहेत. मुंबई इंडियन्स नवव्या क्रमांकावर आहे आणि दिल्ली कॅपिटल्स आठव्या स्थानावर पोहचले आहेत.

दिल्ली कॅपिटल्स ला दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरात, लखनौ, चेन्नई आणि दिल्ली संघाचे प्रत्येक दोनदोन सामने झाले आहेत आणि यामध्ये फक्त गुजरात संघाचा दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. चेन्नई आणि लखनौ संघाला एका एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली कॅपिटल्स च्या संघाला दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हे ही वाचा : 

IPL 2023 DC Vs GT, आज येणार दिल्ली आणि गुजरात आमने सामने, पांड्या विजयाचा पॅटर्न कायम ठेवणार?

IPL2023, चेन्नई आणि गुजरातची ताकत वाढणार, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारतात दाखल

CSKvsLSG, लखनऊ सुपर जायंट्सच्या संघामध्ये बदल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version