Ind vs AUS 1st T20 : ऑस्ट्रेलियाचा भारतावर ४ विकेट राखून मात

Ind vs AUS 1st T20 : ऑस्ट्रेलियाचा भारतावर ४ विकेट राखून मात

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ४ विकेटनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia ) यांच्यात पार पडलेल्या पहिल्या टी २० सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने अप्रतिम अशी फलंदाजी करत २०९ धावांचं लक्ष्य सहज गाठलं आहे. ज्यामुळे भारत पहिल्याच सामन्यात ४ विकेट्सनी पराभूत झाला आहे. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर २०९ धावांचे तगडे आव्हान ठेवले होते, पण कांगारुंनी ४ चेंडू आणि ४ विकेट्स राखून सामना जिंकला आहे.

सामन्यात सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दीक पांडेनी एकहाती तुफान फलंदाजी करत ३० चेंडूत नाबाद ७१ धावा ठोकल्या आणि धावसंख्या २०८ पर्यंत नेत ऑस्ट्रेलियासमोर २०९ धावांचे आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाचा संघ २०९ धावांचं मोठं आव्हान गाठण्यासाठी मैदानात आला असता त्यांची सुरुवातही चांगली झाली. मॅथ्यू वेडने ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. दोन धावा शिल्लक असताना वेड बाद झाला, पण कमिन्सने स्ट्राईकवर येत चौकार खेचत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

सामना झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रोहित म्हणाला, मला वाटत नाही की आम्ही चांगली गोलंदाजी केली. २०० धावांचा बचाव करण्यासाठी एक चांगली संधी होती. आम्ही सामन्यात मिळालेल्या अनेक संधींचा फायदा घेतला नाही. संघाली फलंदाजांनी खुप चांगली खेळी केली, मात्र गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. ही अशी गोष्ट आहे ज्यावर लक्ष देण्याची गरज आहे. नेमके काय चुकले हे समजून घेण्याची चांगली संधी आहे. रोहितने सांगितले की, अखेरच्या ४ षटकात कोणीच चांगली गोलंदाजी केली नाही त्यामुळे संघाचा पराभव झाला. अखेरच्या काही षटकात आम्ही विकेट न घेतल्याने मॅच गेली. जर आणखी एखादी विकेट घेतली असती तर परिस्थितीती वेगळी असती.

हे ही वाचा:

राशी भविष्य : २१ सप्टेंबर २०२२- तुमचे ध्येय आणि दातृत्व याची सांगड घालण्यासाठी…

World Peace Day 2022: जाणून घ्या शांतता दिनाचा इतिहास, महत्त्व आणि या वर्षासाठीची थीम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version