IND vs AUS, T20 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टी20 असणार निर्णायक

IND vs AUS, T20 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टी20 असणार निर्णायक

हैदराबादमध्ये अखेरच्या टी२० सामन्यात भारतीय संघ विजयाच्या निश्चयाने उतरणार असून मालिका २-१ अशी जिंकण्याचा रोहित शर्माचा प्रयत्न असेल. मोहालीत पराभूत झाल्यानंतर नागपूरमधील दुसऱ्या टी२० लढतीत ६ गडी राखून विजय साकारल्यानंतर आता टीम इंडिया विश्वकरंडकाआधी मालिका विजयाला गवसणी घालून आत्मविश्वास मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. अर्थात भारतीय संघाला यानंतर दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करावयाचे आहेत; पण त्याआधी हर्षल पटेल व युझवेंद्र चहलचा फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय असणार आहे.

आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी२० सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सामना सुरु होईल. अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. हा सामना हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियातील सामना रविवारी म्हणजे आज होत आहे आणि अंदाजानुसार रविवारी (दि.२५) पाऊस पडणार नसल्याचे हवामान अंदाजात वर्तवले आहे. पण पाऊस हा साधारण दुपारी पडणार असल्याचे सांगितले जात आहे. पण हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत मैदान सुकवता येऊ शकते. सामना सुरु असताना एखाद-दुसऱ्या पावसाच्या हलक्या सरी येऊ शकतात. पण त्यामुळे सामन्यामध्ये जास्त बाधा येणार नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे या सामन्यात जो संघ नाणेफेक जिंकेल, तो प्रथम गोलंदाजी स्विकारेल आणि धावांचा पाठलाग करण्याला प्राधान्य देईल. कारण धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला किती षटकांमध्ये किती धावा करायच्या आहेत, हे समजू शकते. त्यामुळे कोणताही संघ धावांचा पाठलाग करायला जास्त प्राधान्य देऊ शकतो.

भारतीय संघ मध्ये रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, दीपक चाहर खेळाडू असतील.

हे ही वाचा:

भाजपाचे अनेकजण काँग्रेसच्या संपर्कात ; नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version