spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ind vs Aus T20 : भारत ऑस्ट्रेलिया आज आमने सामने

आजपासून भारत ऑस्ट्रेलिया T20आमने सामने खेळले जाणार आहेत. या सामन्याकडे अनेक भारतीयांचे लक्ष आहे. ही भरतासाठी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून पहिली जात आहे. मोहालीच्या मैदानावर आज अ‍ॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखालील भारतात दाखल झालेला ऑस्ट्रेलियाचा पाहुणा संघ भारतीय संघाविरोधात मैदानात उतरणार आहे. आशिया चषक स्पर्धेमधून अगदीच अनपेक्षितरित्या बाहेर पडलेल्या भारतीय संघासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची असणार असून टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांचंही या मालिकेकडे विशेष लक्ष असणार आहे.

आजचा सामना पंजाबमधील मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरु खेळला जाणार आहे. ६.३० वाजता नाणेफेक होईल आणि ७ प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होईल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या मालिकेचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. आजचा सामना स्टार स्पोर्ट्सच्या स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी वन या हिंदीवर पाहता येईल. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पुढील सामना शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील अंतिम सामना हा रविवारी २५ सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळवण्यात येईल.

भरताचे खेळाडू रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, दीपक चहर, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल यांचा सहभाग असेल. तर ऑस्ट्रेलिया संघ अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, कॅमरुन ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शॉन अ‍ॅबट, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, डॅनियल सॅम्स, अ‍ॅश्टन एगर, अ‍ॅडम झॅम्पा, केन रिचर्डसन, नेथन एलिस असा असेल.

हे ही वाचा:

दसरा मेळाव्याआधी शिंदे गटाला धक्का, बंडानंतर पहिल्यांदाच गटप्रमुखांना उद्धव ठाकरे संबोधणार

अखेर तीन दशकांनंतर, काश्मीरमध्ये गुंजणार बॉलिवूडचा आवाज!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss