IND vs AUS – ३ वर्षानंतर विराट कोहलीचे अविस्मरणीय शतक

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा (India and Australia) चौथा कसोटी सामना सुरू आहे विराट कोहलीने (Virat Kohli) २०२१ नंतर पहिले कसोटी शतक झळकावले आहे. आजच्या चौथ्या कसोटी मध्ये विराटने चौथा दिवस नावावर करतांना कसोटीतील २८ वे शतक पूर्ण केले आहे.

IND vs AUS – ३ वर्षानंतर विराट कोहलीचे अविस्मरणीय शतक

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा (India and Australia) चौथा कसोटी सामना सुरू आहे विराट कोहलीने (Virat Kohli) २०२१ नंतर पहिले कसोटी शतक झळकावले आहे. आजच्या चौथ्या कसोटी मध्ये विराटने चौथा दिवस नावावर करतांना कसोटीतील २८ वे शतक पूर्ण केले आहे. रवींद्र जडेजानंतर (Ravindra Jadeja) विराटने यष्टिरक्षक-फलंदाज केएस भरत (KS Bharat) ५०+ धावांची भागीदारी करून भारताला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करून दिली आहे. शुबमन गिलच्या शतकाने भारताला चौथा कसोटी सामन्यांमध्ये चांगल्या स्थानांवर नेले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरास भारताकडून धुव्वादार फलंदाजी पाहायला मिळाली आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुबमनने अनुभवी चेतेश्वर पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी २४८ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. शुबमन गिलने २३५ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि १ षटकारसह १२८ धावांवर बाद झाला. शुबमनला नॅथन लाएनने LBW केले. त्यानंतर विराट कोहलीने भारताचे नेतृत्व सांभाळता अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपवला होता तेव्हा भारताचे ३ फलंदाज बाद आणि २८९ धाव झाल्या होत्या. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या काही षटकांनंतर रवींद्र जडेजा बाद झाला. विराट कोहलीसोबत रवींद्र जडेजाची चांगली भागेदारी चालू असताना उस्मान ख्वाजाच्या हातात झेल दिला.

रवींद्र जडेजांने ८४ चेंडूमध्ये २८ धावा घेऊन तो बाद झाला. विराटसोबत त्याने ६४ धावा जोडल्या होत्या. टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर सुद्धा त्याने असाच फटका मारला होता आणि त्यावर तो वाचला होता पण त्याने तीच चूक पुन्हा केली आणि विकेट गमावला. विराट आणि केएस भारत यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. कॅमेरून ग्रीन च्या एका षटकात भरतने दोन षटकार व एक चौकार १९ धावा घेतल्या. या कसोटीतील हे सर्वात महागडे षटक ठरले आहे. नॅथन लाएनने ही विकेट मिळवून दिली आहे. भरत ८८ चेंडूत ४४ धावांवर बाद झाला आणि विराटसोबत त्याची ८४ धावांची भागीदारी संपुष्टात आली.

हे ही वाचा :

ईडीच्या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांना भावना झाल्या अनावर

Satish Kaushik यांच्या मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण? पोलिसांना सापडली औषधे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version