spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs BAN: भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी चांगली बातमी, पावसाची शक्यता पूर्णपणे संपुष्टात

T20 World Cup 2022 ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत टीम इंडियाच्या तीन मॅचेस झाल्या आहेत. त्यापैकी टीम इंडियाने दोन मॅच जिंकल्या आहेत. आज टीम इंडियाची बांगलादेशविरुद्ध मॅच होणार आहे. पण आजच्या मॅचवरती पावसाचं सावट असल्याची स्ट्रेलियाच्या हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. परंतु आता पावसाची शक्यता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. टीम इंडियाचं सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हवामान कसे असेल?

हवामान थोडे थंड असेल, परंतु पावसाची शक्यता नाही. सामना सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी, तापमान १३-१५ अंशांच्या दरम्यान असेल. अॅडलेडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हवामान खूपच खराब होते. पावसामुळे दोन्ही संघ घरामध्ये सराव करत होते. मात्र आता रात्री आठपर्यंत पावसाची शक्यता नाही. त्याच वेळी, वाऱ्याचा वेग २५-३५ किमी प्रतितास राहील आणि आर्द्रता ६० टक्के राहील.

हेही वाचा : 

Morbi Bridge Collapse : ओरेवा कंपनीच्या मॅनेजरचे धक्कादायक विधान म्हणाले ; ‘…अपघात ही ईश्वराची इच्छा’

आजच्या मॅचमध्ये बांगलादेश टीमचा पराभव करणे टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. टीम इंडियाचे तीन सामन्यात ४ गुण आहेत. शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचे गुणे देखील टीम इंडिया एव्हढेचं आहेत. गुणतालिकेमध्ये आफ्रिका, इंडिया, बांगलादेश, झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि नेदरलँड अशी क्रमवारी आहे.

आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव केला, तर टीम इंडियाकडे ६ गुण होतील. त्याचबरोबर टीम इंडिया एक नंबरला जाईल. त्यानंतर टीम इंडियाला झिम्बाब्वेबरोबरची मॅच जिंकावी लागेल. सध्या आफ्रिका टॉपमध्ये आहे. आफ्रिका टीमने पाकिस्तान टीमचा पराभव केला, तर आफ्रिका टीमला सात गुण मिळतील. टीम इंडियाच्या उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या तर टीम इंडियाकडे आठ गुण असतील. परंतु उरलेल्या सगळ्या मॅच आफ्रिका टीमने जिंकल्या तर त्याचे गुण ९ असतील.

Bharat Jodo Yatra : अभिनेत्री पूजा भट्ट काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी; फोटो झाले व्हायरल

बांगलादेशविरुद्ध चांगला रेकॉर्ड

विशेष म्हणजे भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने एकूण १० सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर बांगलादेशने केवळ एकच सामना जिंकला आहे. अशा स्थितीत टीम इंडियाचा वरचष्मा दिसत आहे.

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीच्या आयोजनावरून वादाचा आखाडा

Latest Posts

Don't Miss