spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs BAN T20 WC: पावसाच्या व्यत्ययानंतर सामना पुन्हा सुरु, कमी ओव्हर्स मध्ये बांग्लादेशला विजयासाठी नवीन टार्गेट

टी२० विश्वचषक स्पर्धेत सुरु भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. भारताची फलंदाजी होऊन भारतानं १८५ धावांचं टार्गेट बांगलादेशला दिलं होतं. दरम्यान बांगलादेशच्या ७ ओव्हर्स खेळून झाल्यावर पाऊस आला, ज्यानंतर आता सामना पुन्हा सुरु होत असून १६ ओव्हर्सचा खेळ कऱण्यात आला आहे. तसंच बांगलादेशचं टार्गेटही १५१ करण्यात आलं आहे. त्यामुळे आता बांगलादेशला ५४ बॉलमध्ये ८५ रन करायचे आहेत.

बांग्लादेशची चांगली सुरुवात

बांग्लादेशने दमदार सुरुवात केली होती. बांग्लादेशच्या ७ ओव्हर्समध्ये बिनबाद ६६ धावा झाल्या होत्या. बांग्लादेशची सलामीची जोडी मैदानात आहे. लिट्टन दासने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने भारतीय गोलंदाजीवर हल्लोबल केला. लिट्टन दासने २६ चेंडूत नाबाद ५९ धावा केल्या. त्याने ७ फोर आणि ३ सिक्स लगावले. नजमुल शांतो ७ धावांवर नाबाद आहे. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी या सगळ्याच वेगवान गोलंदाजाचा त्याने समाचार घेतला.

Maharashtra Kesari : राज्यात ‘राजकीय कुस्तीचा’ सामना रंगणार, ठाकरेंना विरोध करणारा युपीचा खासदार महाराष्ट्र दौऱ्यावर

सामन्यात सर्वात आधी बांगलादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला कमी धावांत रोखून निर्धारीत लक्ष्य पूर्ण लवकर करायचा प्लॅन त्यांनी आखला होता. त्यानुसार बांगलादेशनं भारताचा कर्णधार रोहितला अवघ्या २ धावांवर तंबूतही धाडलं. राहुलही तसा हळू-हळू खेळत होता. पण विराट जोडीला आला आणि राहुल-विराटने फटकेबाजी सुरु केली. ५० धावा करुन राहुल बाद झाला, त्यानंतर सूर्यकुमारनेही ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर मात्र पांड्या, अक्षर, कार्तिक स्वस्तात बाद झाले. अखेर आश्विनने ६ बॉलमध्ये नाबाद १२ महत्त्वपूर्ण धावा केल्या दुसरीकडे किंग कोहलीच्या नाबाद ६४ धावांच्या जोरावर भारतानं १८४ धावा स्कोरबोर्डवर लावल्या. आता बांग्लादेशचा संघ १८५ धावा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. बांगलादेशकडून हसन महमूदनं ३ तर कर्णधार शाकीब अल् हसननं २ विकेट्स घेतल्या.

Latest Posts

Don't Miss