spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs BAN याआधीही मीरपूरमध्ये दोन कसोटी सामने खेळली आहे टीम इंडिया, जाणून घ्या कसा आहे रेकॉर्ड

त्यामुळे यावेळी सुद्धा भारताला हा सामना जिंकून हा रेकॉर्ड कायम ठेवता येतोय का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मीरपूर येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक झाली असून नाणेफेक जिंकून बांग्लादेशाने प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे आणि त्यामुळे भारत गोलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर टीम इंडियाने यापूर्वी देखील दोन कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात भारतीय संघाने (team India) सहज यश मिळवले आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा भारताला हा सामना जिंकून हा रेकॉर्ड कायम ठेवता येतोय का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

२३९ धावांनी टीम इंडियाने जिंकला होता पहिला सामना

भारतीय संघाने मे २००७ मध्ये या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला होता. पहिल्या डावात दिनेश कार्तिक, वसीम जाफर, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या शतकांमुळे टीम इंडियाने ३ गडी गमावून ६१० धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात बांगलादेशच्या संघाला खास कामगिरी करता आली नाही. त्यांचा पहिला डाव ११८ धावांत आटोपला तर फॉलोऑननंतर त्यांचा दुसरा डाव २५३ धावांवर आटोपला. ज्यामुळे टीम इंडियाचा २३९ धावांनी विजय झाला.

१० गडी राखून दुसऱ्या सामन्यात मिळवला विजय

जानेवारी २०१० मध्ये मीरपूर येथे झालेल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात २३३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिला डाव ८ विकेट गमावून ५४४ धावांवर घोषित केला. यावेळी बांगलादेश संघाचा दुसरा डाव ३१२ धावांवर आटोपला. ज्यानंतर भारतीय संघानं २ धावांचे लक्ष्य १० गडी राखून जिंकले.

मीरपूरमधला भारतीय खेळाडूंचा रेकॉर्ड

मीरपूरमध्ये सर्वाधिक धावा (२६५) करणारा सचिन तेंडुलकर हा भारतीय फलंदाज आहे. राहुल द्रविड (२४०) आणि एमएस धोनी (१४०) हे येथे नंबर-२ आणि नंबर-३ वर असणारे भारतीय फलंदाज आहेत. झहीर खान गोलंदाजीत सर्वाधिक (१७) बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्यानंतर अनिल कुंबळे (५) आणि इशांत शर्मा (५) यांचा नंबर लागतो.

दुसऱ्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडिया

केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज

हे ही वाचा:

IPL 2023 Mini Auction मध्ये दिसणार सनरायझर्स हैदराबादचा लक्ष्यवेधी चेहरा, जाणून घ्या नक्की कोण आहे हा चेहरा?

Pathaan New Song Release पठाण या चित्रपटामधील ‘Jhoome Jo Pathaan Song’ प्रेक्षकांच्या आलं भेटीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss