IND vs BAN: टीम इंडियाचा T20 विश्वचषकातील पुढचा सामना कधी आणि कुठे पाहायचा?

IND vs BAN: टीम इंडियाचा T20 विश्वचषकातील पुढचा सामना कधी आणि कुठे पाहायचा?

टीम इंडियाने T२० विश्वचषक २०२२ च्या सुपर-१२ फेरीत आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. भारतीय संघाने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवला आहे, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम इंडिया ग्रुप २ च्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित करण्यासाठी त्याला सुपर-१२ फेरीतील शेवटचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. आता टीम इंडियाचा पुढील सामना बांगलादेशशी होणार आहे. हा सामना अॅडलेड ओव्हलवर होणार आहे. हा सामना २ नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल. या महत्त्वाच्या सामन्याचे स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण होणार आहे. डिस्ने+हॉटस्टार अॅपवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

हेही वाचा : 

कृषिमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती; ‘शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात…’

भारताचं आव्हान बांग्लादेशसाठी सोपं नाही

भारतावर मात करणं बांग्लादेश टीमसाठी इतकं सोपं नाहीय. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा शेवटचा सामना गमावला. पण भारताची बॅटिंग युनिट फॉर्ममध्ये आहे. सूर्यकुमार यादवने सलग दोन सामन्यात दोन अर्धशतक ठोकली आहेत. सूर्यकुमार यादवपासूनच मुख्य धोका असल्याचं शाकीब अल हसनने मान्य केलं. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा बेस्ट T २० फलंदाज आहे, असं शाकीब अल हसन म्हणाला.

Bacchu Kadu : अमरावतीत आज प्रहारचा मेळावा, ‘जपून रहा रे रवी राणा, बच्चू भाऊ आला रे…’ कडू यांच्या कार्यकर्त्यांचं आव्हान?

शाकीब फ्लॉप

T २० वर्ल्ड कपमध्ये शाकीबच प्रदर्शन खूपच खराब आहे. बांग्लादेशी कॅप्टनने ३ मॅचमध्ये १०.३३ च्या सरासरीने ३१ धावाच केल्या आहेत. शाकीबचा स्ट्राइक रेटही १०० पेक्षा कमी आहे. गोलंदाजीत त्याने ३ विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनमी रेट प्रतिओव्हर ९ रन्सपेक्षा जास्त आहे.

Narendra Dabholkar Birthday : समाजसेवक “नरेंद्र दाभोळकर” यांच्या जयंती निमित्त खास फोटो

Exit mobile version