spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs ENG: विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय T-20 क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात T-20 विश्वचषक २०२२ स्पर्धेतील दुसरा सेमीफानयल सामना खेळला जातोय. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं.

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात T-20 विश्वचषक २०२२ स्पर्धेतील दुसरा सेमीफानयल सामना खेळला जातोय. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४००० हजार धावांचा टप्पा गाठला आहे.

T20 विश्वचषक २०२२ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना आज अँडलेड ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. अँडलेड ओव्हल विराट कोहलीचे आवडते मैदान आहे. विराट कोहलीने पुन्हा इतिहास रचला आहे. कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीला हा विक्रम करण्यासाठी फक्त ४२ धावांची गरज होती. पण त्याने इंग्लंडविरुद्ध ताबडतोड अंदाजमध्ये T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपल्या ४००० धावा पूर्ण केल्या आहेत. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अशी कामगिरी करणारा कोहली पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.या उपांत्यपूर्व फेरीपूर्वी कोहलीने T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण ११४ सामन्यांमध्ये ५२.७७ च्या सरासरीने ३९५८ धावा केल्या होत्या. यादरम्यान कोहलीने एक शतक आणि ३६ अर्धशतके झळकावली. मात्र उपांत्य फेरीत ४२ धावा करताच कोहलीने ४००० धावा पूर्ण केल्या आहेत.

कोहली याआधी आंतरराष्ट्रीय T-20 मध्ये तीन हजार धावा करणारा पहिला क्रिकेटर बनला होता. गेल्या वर्षी त्याने ही कामगिरी केली होती. कोहलीने ८७ सामन्यांच्या ८१ डावांमध्ये ५०.८६ च्या सरासरीने ३ हजार धावा केल्या.

हे ही वाचा :

IND vs ENG : भारताने इंग्लंडला दिलं १६९ धावाचं आव्हान

Maldives Fire : मालदीवची राजधानी मालेमध्ये भीषण आग

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss