spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs IRE, टीम इंडियाचा आयर्लंड दौरा, बुमराह सांभाळणार संघाची धुरा…

जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच (ऑगस्ट १५) मंगळवारी सकाळी आयर्लंडला (Ireland) रवाना झाला. टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध तीन टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच (ऑगस्ट १५) मंगळवारी सकाळी आयर्लंडला (Ireland) रवाना झाला. टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध तीन टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे. अनेक खेळाडूंसाठी ही एक महत्त्वाची मालिका असेल पण सर्वांच्या नजरा जसप्रीत बुमराहवर असतील. तब्बल दीड वर्षानंतर जसप्रीत बुमराह राष्ट्रीय संघात पुनरागमन करत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे संघापासून दूर होता. भारतीय क्रिकेट बोर्डाने मंगळवारी सकाळी संघ आयर्लंडला रवाना झाल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली. भारतीय क्रिकेटपटूंचे हसरे चेहरे हे दाखवतात की खेळाडू चांगल्या स्थितीत आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धची (West Indies) टी २० मालिका गमावल्यानंतर आता टीम इंडियाचा सामना आयर्लंडशी दोन हात करणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात १८ ऑगस्टपासून तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, या मालिकेत टीम इंडियाची कमान जसप्रीत बुमराहच्या हाती आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेत जवळपास सर्व वरिष्ठ (senior) खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह या संघाचा कर्णधार आहे. त्याचबरोबर यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शाहबाद अहमद, शिवम दुबे आणि जितेश शर्मा या युवा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी, भारतीय संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे असेल, जो पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा तंदुरस्त झाला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर तो मैदानात परतणार आहे, याशिवाय या टी २० मालिकेसाठी रिंकू सिंग (Rinku Singh) आणि जितेश शर्मा (Jitesh Sharma) यांचाही टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने (BCCI) खुद्द याबाबतचे ट्वीट शेअर केले आहे आणि पोस्टच्या खाली “हम आ गये.” हे शीर्षक दिले आहे.

भारत-आयर्लंड टी२० मालिकेचे वेळापत्रक

१८ ऑगस्ट – पहिली टी२० (डब्लिन), भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता
२० ऑगस्ट – दुसरी टी२० (डब्लिन), भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता
२३ ऑगस्ट – तिसरी टी२० (डब्लिन), भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता

टी२० मालिकेसाठी भारतीय संघ

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाबा अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि आवेश खान.

टी२० मालिकेसाठी आयर्लंड संघ

पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, मार्क एडेअर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोशुआ लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन व्होइरकॉम , बेन व्हाईट आणि क्रेग यंग.

हे ही वाचा:

१५ महिन्यात तुटला भाज्यांवरील महागाईचा रेकॉर्ड…

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पुणेकरांचा मेट्रो सफर सुसाट, पुणेकरांची मेट्रोत प्रचंड गर्दी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss