spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs NZ 3rd ODI रोहित आणि गिलचे अर्धशतक पूर्ण, भारताची १५० धावांच्या दिशेने वाटचाल सुरू

त्याचवेळी प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना (IND vs NZ 3rd ODI) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली. या सामन्यात गिल चौकार आणि षटकार मारताना दिसत आहे. दरम्यान, गिलने असा षटकार मारला की, कर्णधार रोहित शर्माही पाहून थक्क झाला. त्याची प्रतिक्रिया सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

शुभमन गिलचा षटकार पाहून रोहित शर्माही झाला थक्क

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार रोहितने अर्धशतके झळकावली आहेत. शुभमन गिल या सामन्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने डावाच्या ३१व्या ओव्हरमध्ये मैदानावर चौकार आणि षटकार मारत शानदार कामगिरी केली. लॉकी फर्ग्युसनची ही ओव्हर न्यूझीलंड संघाला खूपच महागात पडल्याचे दिसत आहे.

या ओव्हरमधील पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर गिलने चौकार मारले. त्याचवेळी पाचव्या चेंडूवर आकाशी षटकार मारला. यावेळी न्यूझीलंड संघाचा गोलंदाज लॉकीने ऑफ-स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला, पण फलंदाजाने ओव्हर पॉइंटच्या दिशेने कट शॉट मारला आणि चेंडू स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला.

गिलचा हा षटकार पाहून कर्णधार रोहित शर्माही खूप आनंदी आणि आश्चर्यचकित झालेला दिसला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित याने दिलेली त्याची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. कर्णधार रोहित शर्माने शुभमन गिलला त्याच्या ह्या चमकदार कामगिरीबद्दल चिअर केले आणि त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देखील दिली आहे.

हे ही वाचा:

Majha Maharashtra Majha Vision, देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट, ‘मविआ सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव’

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला गुजरातमध्ये समर्थन, पहा नेमकं काय झालं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss