IND vs NZ 3rd ODI भारत आणि न्यूझीलंड संघात होणार एकदिवसीय मालिकेतील शेवटची लढत, इथे पाहता येणार लाईव्ह सामना

दुसरीकडे, न्यूझीलंड संघाला मालिकेतील या शेवटच्या सामन्यात दिलासा देणारा विजय नोंदवायचा आहे.

IND vs NZ 3rd ODI भारत आणि न्यूझीलंड संघात होणार एकदिवसीय मालिकेतील शेवटची लढत, इथे पाहता येणार लाईव्ह सामना

टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका आधीच जिंकली आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून टीम इंडियाने २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड संघाला क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाला मालिकेतील या शेवटच्या सामन्यात दिलासा देणारा विजय नोंदवायचा आहे.

सामना कधी आणि कुठे बघायचा?

भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २४ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजता सुरू होईल. हा सामना होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर येथे होणार असून या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर केले जाणार आहे. तसेच डिस्ने + हॉटस्टार अॅपवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने १२ धावांनी रोमहर्षक विजयाची नोंद केली. यानंतर टीम इंडियाने दुसरा सामना ८ गडी राखून एकतर्फी जिंकला. अशा स्थितीत तिसऱ्या सामन्यातही भारताचे वर्चस्व दिसून येत आहे. यावेळी भारतीय संघाचे सर्व फलंदाज चांगल्या लयीत असून त्यांच्यातील ताळमेळही उत्तम असल्याचे दिसून येत आहे. वरच्या फळीतील रोहित, शुभमन आणि विराट यांसारख्या बलाढ्य फलंदाजांमध्ये आता हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या अष्टपैलू खेळाडूंचा समावेश झाला आहे. मधल्या फळीसाठीही भारतीय संघाकडे सूर्यकुमार यादव आणि इशान किशनसारखे फलंदाज आहेत.

गेल्या सामन्यातही टीम इंडियाची गोलंदाजी मजबूत होती. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत, आता मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्यानेही गोलंदाजीत आपली ताकद दाखवली आहे. गेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला अवघ्या १०८ धावांत ऑलआउट केले होते.

हे ही वाचा:

२५ जानेवारीला सलमान खान चाहत्यांना देणार डबल गिफ्ट, मोठ्या पडद्यावर रिलीज होणार ‘किसी का भाई किसी की जान’ चा टीझर

Governor Bhagat Singh Koshyari, राज्यपालांचा राजीनामा कोण मंजूर करतं?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version