IND vs NZ : न्यूझीलंडनं ठेवला भारतासमोर १६१ धावांचे लक्ष; भारताची सुरुवात खराब

IND vs NZ : न्यूझीलंडनं ठेवला भारतासमोर १६१ धावांचे लक्ष; भारताची सुरुवात खराब

भारत आणि न्यूझीलंड संघात ३ सामन्यांच्या टी२० मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना मंगळवारी दिनांक २२ नोव्हेंबर रोजी नेपियर येथे खेळला जात आहे. न्यूझीलंडचा आजच्या सामन्यातील कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार केन विलियम्सन दुखापतीमुळे आजचा सामना खेळू शकला नाही. त्याच्या एवजी मार्क चॅपमनला संघात स्थान देण्यात आले. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर त्यांनी १६० या सन्मानजनक धावसंख्या उभारली.

न्यूझीलंडच्या त्या दोन खेळाडूंव्यतिरिक्त कोणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ते दोन खेळाडू म्हणजेच डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स होय. भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावर दबाव आणत शेवटच्या पाच षटकात ३० धावांत तब्बल ८ गडी गमावले. या दोघांच्या जोरावरच न्यूझीलंडला दीडशे धावांचा आकडा पार करता आला. हा सामना न्यूझीलंडसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण, यापूर्वी झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे भारत या मालिकेत १-०ने आघाडीवर आहे. टीम इंडियाकडून गोलंदाजी करताना दोनच गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाकेनऊ आणले. यामध्ये अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. दोघांनीही प्रत्येकी ४ गडी बाद करत आपल्या नावावर एक विक्रम केला. तर डावखुरा गोलंदाज अर्शदीपने ४ षटकात ३७ धावा देत ४ बळी घेतले. त्याला, हर्षल पटेल याने १ गडी बाद करत मोलाची साथ दिली.

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) टी२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने ६५ धावांनी दमदार असा विजय मिळवला. ज्यानंतर आता तिसरा आणि मालिकेतील अखेरचा टी२० सामना आज खेळवला जात आहे. भारताने आजचा सामना जिंकल्यास मालिकाही भारत जिंकेल. तर न्यूझीलंड जिंकल्यास मालिका अनिर्णीत सुटणार आहे. त्यामुळे आजचा सामना अगदी निर्णायक असणार आहे.

हे ही वाचा : 

ठाकरे – फडणवीसांच्या चुकीनं राज्याचं होतयं रोज ५८ कोटींचं नुकसान #DevendraFadnavis #UddhavThackeray

खोटे गुन्हे दाखल केल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांचे खळबळ जनक ट्वीट

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version