spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs NZ न्यूझीलंडचा डाव थोडक्यात आटोपला, १०९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी भारत तयार

सध्या सुरू असणारा भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना ३४.४ ओवर्समध्ये आटोपला आहे. न्यूझीलंड या संघाकडून ग्लेन फिलिप्सने (३६) सर्वाधिक धावा केल्या आहेत.

आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय सामना खेळला जात आहे. रायपुरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या स्टेडियममध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन केले गेले आहे. सध्या सुरू असणारा भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना ३४.४ ओवर्समध्ये आटोपला आहे. न्यूझीलंड या संघाकडून ग्लेन फिलिप्सने (३६) सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ५२ चेंडुंच्या खेळीत ५ चौकार मारले. तर भारताकडून मोहम्मद शमीने तीन विकेट्स घेतल्या आहेत. तसेच हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स तर मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ पत्त्यासारखा विखुरलेला दिसला. एक ठराविक अंतराने विकेट गमावल्यामुळे न्यूझीलंड संघाची सुरुवात फारच निराशाजनक झाली. सलामवीर फिन एलन (०) पहिल्या ओवरमध्येच बोल्ड झाला. तर, हेनरी निकोल्स (२), डेरील मिचले (१) आणि डेवोन कॉनवे (७) यांचीही फलंदाजी आज वाखाडण्याजोगी नव्हती. तसेच संघाचा कर्णधार टॉम लॅथम हा १७ चेंडूत फक्त १ धाव करू शकला. अवघ्या १५ धावा करून ५ खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले. फिलिप्सने सहाव्या विकेट पूर्वी मायकेल ब्रेसवेल (२२) याच्यासह ४१ धावांची भागीदारी केली आणि मिचेल सेंट्रनसोबत सातव्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली.

भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी कायम ठेवली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हैदराबादमध्ये झालेल्या रोमहर्षक सामन्यात १२ धावांनी न्यूझीलंड संघाचा पराभव केला होता.

हे आहेत दोन्ही संघ:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

न्यूझीलंड – फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सॅंटनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.

हे ही वाचा:

गोवा विमानतळावर आला धमकीचा फोन, मॉस्कोहून येणारे विमान वळवले उझबेकिस्तानला

दावोस करारांवरून शरद पवारांच्या समोरच एकनाथ शिंदेनी विरोधकांना लागावला टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss