IND vs NZ न्यूझीलंडविरुद्ध टी-२० संघाची घोषणा, विराट आणि रोहित संघाबाहेर?

समोर आलेल्या माहितीनुसार, आता रोहित आणि विराट सध्यातरी टी-२० संघात परतणार नाहीत अशी माहिती समोर येत आहे.

IND vs NZ न्यूझीलंडविरुद्ध टी-२० संघाची घोषणा, विराट आणि रोहित संघाबाहेर?

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिका आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पुन्हा एकदा टी-२० मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आता रोहित आणि विराट सध्यातरी टी-२० संघात परतणार नाहीत अशी माहिती समोर येत आहे.

इनसाइड स्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रोहित शर्मा आणि विराट कोहलीची टी-२० संघातून वगळणे कायम आहे. भविष्यात काहीही शक्य आहे, परंतु सध्या आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. आम्हाला पुढे जावे लागेल आणि २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी योजना बनवाव्या लागतील. त्यांचे भविष्य आपण कसे ठरवू शकतो? राष्ट्रीय निवड समिती (BCCI) भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठीच संघ निवडू शकते. रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या भविष्याबद्दल निर्णय घेण्यास आणि बोलण्यास पूर्णपणे मोकळे आहेत.

हार्दिक पांड्या करणार टी-२० संघाचे नेतृत्व

रोहित शर्मा टी-२० संघात नसल्यामुळे भारतीय संघाची कमान अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो भारतीय संघाचा कर्णधार असेल. त्याचबरोबर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे असेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ आणि मुकेश कुमार.

भारत न्यूझीलंड टी-२० मालिका वेळापत्रक:

हे ही वाचा:

IND vs SL तिरुवनंतपुरममध्ये भारत आणि श्रीलंका तिस-या वनडेत भिडणार, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार थेट सामना

Makar Sankranti 2023, मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर गंगा नदीच्या काठावर भाविकांची गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version